Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, नोव्हेंबर ०३, २०१७

अज्ञात इसमाचे प्रेत सापडले नग्न अवस्थेत

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड-ब्रह्मपुरी मार्गावर घटना

नागभीड़:(ललित लांजेवार)
 ब्रह्मपुरी महामार्गावर रेल्वेच्या गोडाऊन जवळ आज दुपारी 2 वाजता एका बाभळीच्या झाडाला अध्यात इसमाचे प्रेत नग्नावस्थेत लटकलेल्या स्थितीत आढळले.आज दुपारच्या दरम्यान विद्युत विभागाचे काही कर्मचारी घटनास्थळाजवळील विद्युत जनित्र दुरुस्तीचे काम करीत असताना त्यांना हा प्रकार दिसला.त्यानंतर या घटनेची माहिती वाऱ्याच्या वेगाने परिसरात पसरली. झाडाला लटकलेली प्रेत दिसतात विद्युत कर्मचा-यांनी परिसरात इकडे तिकडे बघितले मात्र परिसरात त्यांचा व्यतीरिक्त कोणीच दिसले नाही. मृताला फाशी लागलेल्या बाभळीच्या झाडाजवळ शौचविधी आटोपलेल्या अवस्थेत दिसून आला. व मृताच्या शरीरावरील अंतर्गत वस्त्रांनी शौच विधी पुसण्यात आली असल्याचे आढळून आले हा संपूर्ण घटनाक्रम
 व प्रकार काही तरी वेगळाच असल्याचे बोलल्या जात होते.
मृतक हा मनोरुग्ण असावा अशी माहिती नागभीड़ पोलिसांनी दिली मात्र सदर मृत्यू संशयास्पद असल्याने हत्याच असल्याची चर्चा आहे.पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करत परियंत मृताची ओळख पटलेली नव्हती . या संपूर्ण प्रकाराचा तपास  नागभीड़ पोलिस स्टेशनचे ठाणेदार आनंद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मस्के करीत आहे


 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.