चंद्रपूर/प्रतिनिधी :
नोटाबंदीच्या निर्णय देशाच्या अर्थवेवस्थेला पारदर्शक इमानदार व तटस्थ करण्याच्या प्रयत्नातील एक आदर्श पाऊल आहे. केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाची आज वर्षपूर्ती आहे. त्या निमित्य भाजप तर्फे नोटाबंदी निर्णयाच्या वर्षपूर्तीच्या जलौषात स्वागत करण्यात आले. स्थानिक गिरनार चौक येथे महापौर अंजली घोटेकर, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, गटनेता मनपा वसंता देशमुख यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी नगरसेवक सुभाष कसनगोट्टूवार, राहुल घोटेकर, राजेंद्र अडपेवार, रवींद्र वायकर, शाम कनकंम, नगरसेविका सविता कांबळे, वंदना तिखे, चंद्रकला सोयाम, आशाताई अबोजवार, पुष्पा उराडे, शीतल गुरनुले, शीतल कुळमेथे, मायाताई उईके, वनिता डुकरे, छबूताई वैरागडे, अनुराधा हजारे, जयश्री जुंमडे, ज्योती गेडाम, वंदना जांबूळकर, शीतल आत्राम तसेच पदाधिकारी मंडळ अद्यक्ष प्रमोद शास्त्रकार, मोहन चौधरी, अमीन शेख, सुनील डोंगरे, सजाद अली, निलेश बेडेकर, कृष्णा चंदावार, अमोल नगराळे, स्मिता नंदनवार, गुडदे ताई यांची उपस्थिती होती.
यावेळी भाजप सरकारने तीन वर्षात केलेल्या कामगिरीवर प्रकाश टाकला. नोटबंदीच्या विजय असो, देशका प्रधानमंत्री कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो... असे नारे देण्यात आले होते. राज्याचे वित्त, नियोजन, वने तथा जिल्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर , आमदार नानाजी शामकुळे यांच्या तीन वर्षाच्या कामगिरीबद्दल यावेळी स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.