Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, नोव्हेंबर १७, २०१७

आ. वडेट्टीवार यांच्या प्रयत्नाने धोंगडे कुटुंबियांना मिळाली शासकीय मदत

ब्रम्हपुरी /प्रतिनिधी :
रानडुकराच्या हल्लात मरण पावलेल्या ब्रम्हपुरी तालुक्यातील निलज येथील शेतकरी हिरामण धोंगडे ह्यांच्या कुटुंबियांना आ.विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नाने ७ लाख रुपयाची आर्थिक मदत मिळाली आहे
  हिरामण धोंगडे हे रानडुकराच्या हल्लात मारले गेले होते.आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांना कळताच त्यांच्या कुटुंबाना शासनाकडुन आर्थीक मदत मिळवुन देण्याचे आश्वासन दिले होते व दि १६ नोव्हेंबर २०१७ रोजी निलज येथे त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नी शांता हिरामण धोंगडे यांना शासकीय मदत 700000/- (सात लाख रू. ) चेक देण्यात आले. यावेळी प्रामुख्याने RFO चव्हाण मॅडम, ACF मेश्राम, जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर,पंचायत समिती सदस्य थानेश्वर कायरकर ,अन्नाजी ठाकरे , अशोक भुते,महेश कोपुलवार,केशवराव मैद,विलास धोटे,दोनाडकर पो पा ,व गावातील नागरिक उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.