Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, नोव्हेंबर १९, २०१७

न. खा. वाघे यांचा भाजपला रामराम

चिमुर/ प्रतीनीधी:
        मागील काही दिवसा अगोदर चिमुर सहकारी तांदूळ गिरणीतील संचालक मंडळ बरखास्त करून सहकार खात्याद्वारे अशासकीय प्रशासकाची नियुक्ती करन्यात आली होती. तर नुकतीच आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या प्रयत्नाने आठ अशासकीय संचालकाची नियुक्ती केली. त्यामध्ये नुकतेच नियुक्त केलेले डॉ. श्याम हटवादे, योगेश नाकाडे या दोन संचालकाची नियुक्ती महाराष्ट्र सहकार कायद्याचा भंग केल्याचा आरोप भाजपा तालुका उपाअध्यक्ष न. खा.वाघे यांनी करीत सत्ताधारी भाजपाला घरचा अहेर दिला आहे.
             चिमुर शहरात मागील अनेक वर्षापासून तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी एकत्र येवुन चिमुर सहकारी भात गिरणी ही संस्था निर्माण केली या संस्थेच्या निर्मीतीपासुन संस्थेकडे मोठया प्रमानात जंगम मालमत्ता आहे. मात्र या सहकारी संस्थेत राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप वाढल्यामुळे कुरघोड्या होवु लागल्या यातच मागील संचालक मंडळाचे अध्यक्ष यांच्या एकला चलो कारभारामुळे काही सदस्यांनी राजीनाम दिला होता. त्यामुळे जिल्हा सहकार निबंधक यांनी शासकीय प्रशासकाची नियुक्ती केली होती.
          आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी चिमुर तांदुळ गिरणी मध्ये कार्यरत प्रशासकाच्याएवजी अशासकीय प्रशासन मंडळ नियुक्त करन्यासंबधी तालुकानिबंधक व जिल्हा निबंधक यांच्याकडे पाठपुरावा केल्याने महेंद्र पुजारी कक्ष अधीकारी महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रो उद्योग विभाग आठ अशासकीय प्रशासकाची नियुक्ती केली होती. या आठ अशासकीय प्रशासकापैकी डॉ श्याम हटवादे, योगेश नाकाडे यांची नियुक्ती महाराष्ट्र सहकारी संस्था अधीनियम १९६० कलम ७८ (१) (दोन ) मध्ये संस्थेचा कारभार चालवन्यासाठी रोखुन ठेवलेल्या समीतीचे सदस्य प्रशासक असनार नाही. अशा आशयाचा समावेश आहे. मात्र सत्तेचा गैरवापर व महाराष्ट्र सहकारी संस्था अधीनियमाचा भंग करून केल्याचा आरोप नेरी येथील भाजपाचे उपाध्यक्ष तथा सहकारी तांदुळ गिरणीचे माजी अध्यक्ष न. का.वाघे यांनी केला.
           या अवैद्य अशासकीय प्रशासक नियुक्तीच्या विरोधात सहकारमंत्री व सहकार आयुक्त यांचे कडे तक्रार करून भाजपाला घरचा अहेर देत भाजपा उपाध्यक्ष पदाचा व प्राथमीक सदस्यत्वाचा  राजीनामा रवीवार ला चिमुर भाजपा तालुका अध्यक्ष यांच्याकडे दिला. त्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून सत्ताधाऱ्यात व शहरातील नागरिकांत चर्चेला उधान आले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.