Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर ०२, २०१७

नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर

मुंबई : राज्यातील 3 नवनिर्मित नगर परिषद व 125 नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत गुरुवारी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते झाली.

तीन नगर परिषदांपैकी वाना डोंगरी ही नगर परिषद मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाली असून, उर्वरित हुपरी (कोल्हापूर) आणि आमगाव (गोंदिया) या परिषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत.



नगरपंचायत खुला प्रवर्ग सर्वसाधारण :
मुलचेरा, समुद्रपूर, तिवसा, झरी, मेढा, देवनी, गौंडपिंपरी, वडूज, लोणंद, शिरूर, जळकोट, सोयगाव, पेठ, सडक-अर्जुनी, पाटण, खंडाळा, लोहारा ब्रु., कुडाळ, संग्रामपूर, बाभूळगाव, साक्री, अर्जुनी, औंढा-नागनाथ, सावली, कवठेमहांकाळ, दहिवडी, वाशी, घनसावंगी, तळा, बार्शी-टाकळी, कणकवली, केज.

खुला प्रवर्ग (महिला) ः
म्हसळा, विक्रमगड, मोहाडी, सुरगणा, माणगाव, पारनेर, तलासरी, कडेगाव, मालेगाव-जहांगीर, माढा, मौदा, सिंदेवाही, लाखांदूर, चाकूर, वडवणी, माळशिरस, भामरागड, कसई-दोडामार्ग, शिराळा, अहेरी, कुही, धानोरा, लाखणी, राळेगाव, भिवापूर, देवरी, अर्धापूर, मोखाडा, धडगाव-वडफळ्या, दिंडोरी, शहापूर, नेवासा.

नागरिकांचा मागास प्रवर्ग :
जाफराबाद, गुहागर, खानापूर, कोरेगाव, मंठा, शिर्डी, लांजा, हिंगणा, नांदगाव-खंडेश्वर, हिमायतनगर, सेलू, आष्टी (वर्धा), गोरेगाव, पोलादपूर, मोताळा, फुलंब्री, मलकापूर

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ः
अकोले, मंडणगड, माहूर, देवरूख, देवगड-जमसांडे, दापोली, पारशिवनी, कळंब, रेणापूर, आष्टी (बीड), बोदवड, शिंदखेडा, कारंजा, आजरा, देवळा, मुरबाड, वाभवे-वैभववाडी.

अनुसूचित जाती :
मानोरा, चामोर्शी, नायगाव, सेनगाव, आरमोरी, बदनापूर, महादूला.

अनुसूचित जाती (महिला) :
कर्जत, पाटोदा, कोरपना, महागाव, शिरूर-अनंतपाळ, पालम, सिरोंचा, पोंभुर्णा. अनुसूचित जमाती :
कोरची, खालापूर, कळवण, निफाड, धारणी, सालेकसा
अनुसूचित जमाती-महिला : कुरखेडा, भातकुळी, एटापल्ली, वाडा, जिवती, मारेगाव.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.