Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, नोव्हेंबर २६, २०१७

चेंडूशी छेडछाड केल्याने दसून शनाका अडचणीत

नागपूर -भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात नागपूरमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याने श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज दसून शनाका अडचणीत सापडला आहे. त्यानं केलेल्या चुकीची कबुलीही दिली आहे. या प्रकरणी आयसीसीनं त्याच्यावर कारवाई केली आहे.

चेंडूशी छेडछाड करताना शनाका कॅमेऱ्यात कैद झाला होता. आयसीसीचे मॅच रेफरी डेव्हिड बून यांच्यासमोर त्यानं चूक झाल्याचं मान्यही केलंय. या प्रकरणी आयसीसीनं शनाकाला दंडाची शिक्षाही सुनावली आहे. सामन्याच्या मानधनापैकी ७५ टक्के रक्कम दंड म्हणून आकारला आहे. तसंच शनाकाला समजही दिली. कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर शनाकानं त्याची चूक मान्य केली असून, त्यामुळे या मुद्द्यावर आता कोणत्याही औपचारिक सुनावणीची गरज नाही, असं आयसीसीनं स्पष्ट केलं आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.