Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, नोव्हेंबर २७, २०१७

चंद्रपुरात "पद्मावती' चित्रपटाला विरोध

चंद्रपूर /प्रतीनिधी :
महाराणी "पद्मावती" हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये या मागणीसाठी चंद्रपूर येथे राजपूत क्षत्रिय समाज व हिंदू जागरण मंचाच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.२७ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या या आंदोलनात या संघटनांमार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना "पद्मावती"  चित्रपटावर बंदी घालण्यात यावी या मागणी करण्यात आली.

संजय लीला भंसाली दिग्दर्शित महाराणी "पद्मावती"  या चित्रपटात हिंदू धर्मातील महान वीरांगना राणी पद्मावती यांच्या गौरवशाली इतिहासावर व हिंदू परंपरेवर आक्षेपार्ह संवाद व दृष्ये निर्मात्यांनी चित्रीत केले आहे. या प्रकारामुळे हिंदू समाजात संतापाची लाट निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ  लागला आहे. तरी हिंदू समाजाच्या भावनांचा आदर करून या चित्रपटावर बंदी घालण्यात  यावी. तसेच चित्रपट निर्माता संजय लीला भंसाली यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीलाधरुन चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना राजपूत क्षत्रिय समाज व हिंदू जागरण मंचाच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी या दोन्ही संघटनांचे पदधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.