Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, नोव्हेंबर १७, २०१७

योगिताच्या प्रयत्नाने नगरधनात जलयोग

 शितलवाडी सरपंच योगिता गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश
नगरधन प्रादेशिक पाणीपुरवठा योजने अंतर्गत संग्रामपुर येथे पाणीपुरवठा होणाऱ्या टाकीची पाहणी करताना सरपंच गायकवाड 


टेकाडी/प्रतिनिधी
विदर्भातील रामटेक तालुक्यातील धार्मिक स्थळ म्हणून प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल नगरधन रामटेक पासून सात किलोमिटर अंतरावर आहे.बलदंड भुईकोट किल्याने प्रसिद्धीस आलेल्या नगरधन येथील बहुचर्चित नगरधन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बर्याच वर्षा पासून रखडलेल्या अवस्थेत असल्याने तालुक्या अंतर्गत १४ गावांना या योजने पासून वंचित राहावे लागत असे.थंडबस्त्यात असलेल्या या योजनेला नवसंजीवनी देण्याचा निर्धार घेऊन या कार्याला यशाच्या शिखरावर नेण्याचे कार्य ग्राम पंचायत शितलवाडी परसोडा च्या सरपंचा योगिता गायकवाड यांनी शिखर समितीचे अध्यक्ष पद स्वीकाराताच केले.

 नगरधन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना यापूर्वी सूर झाली असता योजनेत रामटेक तालुक्याअंतर्गत एकूण १४ गावे समाविष्ट करण्यात आलेली होती.कालांतराने ही योजना कासव गतीने महिनो महिने खंडित तर काही महिने अखंडित अश्या अवस्थेत रहायची.ज्याचा भुर्दंड समाविष्ट गावांना सोसावा लागत असे यामुळे बहुतांश गावातील अधिकृत प्रशासनांनि आपली स्वतंत्र पाणीपुरवठ्याची व्यवस्था करुन घेतलेली होती.ज्याचे फलित नगरधन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची गणना ही बंद योजनेच्या गणणेंत प्रामुख्याने व्ह्ययला सुरवात झाली.मात्र या योजनेला नवसंजीवनी देण्यासाठी शितलवाडी परसोडा ग्राम पंचायत सरपंचा योगिता गायकवाड यांनी पाहणी करून पुढाकार घेतला व बंद योजनेचे धनुष्य पेलण्याचे आव्हान स्वीकारुन योजनेतिल शिखर समितीच्या अध्यक्ष पदावर बैसताच हे रखडलेले कार्य पहिल्याच दमात हाती घेतले. सर्वात अगोदर महत्वाचं म्हणजे शिखर समितीवर असलेले फिल्टर प्लांटची ११ लाख रुपयांची थकबाकी २६ ऑक्टोबर २०१७ रोजी पूर्णपणे भरून काढली.

नगरधन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविताना लाखो रुपयांचे जुने थकीत वीज देयक भरण्याचे मोठे आव्हाहन समितीच्या अध्यक्षा गायकवाड यांच्या समक्ष जणू आ वासून होते.परंतु संघर्षाशी दोन दोन हात करत नियोजनबद्ध पणे या योजनेच्या कार्याला सुरवात झाली.यापूर्वी ही योजना राबविताना कार्यरत कर्मचाऱ्यांवर ५६ हजार रुपये वेतनापोटी खर्च होत असत परंतु योगिता गायकवाड यांनी कार्यभार हाती घेताच मात्र २० हजार रुपयात चार कर्मचारी या योजनेत कार्यरत ठेवले.तर उर्वरित ३६ हजारांची रकम थकीत वीज देयक भरणा करण्याकरिता वापरण्यात आली.यामुळे थकीत ११ लाख रुपयांचे वीज बिल पूर्णतः संपुष्टात आले

गायकवाड यांच्या नुसार १४ गावांच्या पाणीपूरवठा योजनेची जबाबदारी संभाळणे कठीण होते.परंतु वरिष्ठ प्रतिनिधी व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अधिकारी तसेच माजी आमदार आशिष जैस्वाल यांच्या सहकार्याने योजनेतील अडथळे सहज साध्य करता आले.जैस्वाल यांनी या योजनेसाठी १० टक्के रक्कम भरून योजनेची खंडित वीजपुरवठा पूर्ववत सुरु करन्या संदर्भात शाष्णाच्या निर्णय आणला व उर्वरित थकीत देयक भरण्यासाठी प्रतिमहिना ४१ हजार २८० रुपयांचे १५ मासिक हफ्ते भरन्यासंबंधी सुलभ व्यवस्था केली.जिल्हा परिषद सदस्या वर्षा धोपटे यांनी जिल्हा परिषदे कडून योजनेच्या दुरुस्ती साठी १६ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला.प्रीतिनिधींच्या सजगतेन व योगिता गायकवाड यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्वाने शेवटी नगरधन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरळीत सुरू झाली आणि यशाचे शिखर गाठण्याचा मानाचा तुरा गायकवाड यांच्या शिरपेचात ग्रामस्थानी रोवला.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.