Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, नोव्हेंबर २४, २०१७

रेल्वेच्या डब्यातून सुगंधित तंबाखूची तस्करी

चंद्रपुर/प्रतिनिधी:
सुगंधित तंबाखू साठी इमेज परिणामगोंदिया शहराला लागून छत्तीसगड राज्य लागून असल्यामुळे सुगंधित तंबाखूला महाराष्ट्रत जरी बंदी असली तरी छत्तीसगड राज्यात खुला असल्याने मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू गोंदियाला येतो व तेथून टोळीद्वारे गोंदिया बल्लारपूर रेल्वेने अर्जुनी ,वडसा देसाईगंज व मूल,चंद्रपूर,बल्लारपूर आदी शहरात टोळीतील विविध सदस्या मार्फतपुरवठा केला जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी माहिती मिळाली आहे.
वडसा रेल्वे वरून वडसा,आरमोरी,गडचिरोली,
पर्यंत टोळीचे सदस्य पुरवठा करीत असल्याची माहिती आहे.

देसाईगंज येथील होलसेलर द्वारे राजनन्दगाव छत्तीसगड मधून चारचाकी मालवाहक गाडीने आठवड्यात 2 वेळा लाखोंचा सुगनधित तंबाखु येत असल्याची माहिती युनियन बनवून महिना प्रत्येकी 5 हजार एका व्यापारी एका विभागासाठी व दुसऱ्या विभागाची कारवाई होऊ नये म्हणून खपाचा प्रमाणात 3 ते 20 हजार गोळा करून चिरीमिरी देत असल्याचे समजते.
होलसेल माल ठेवण्यासाठी ग्रामीण भागात व शहरात गोदमातून खुलेआम पुरवठा सुरु असल्याचे निदर्शनास येते आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.