Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर २९, २०१७

विदर्भ प्रहार संघटनेच्या नेतृत्वात एक दिवसीय धरणे आंदोलन

चंद्रपूर/प्रतिनिधी  -
गडचिरोली माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळातील पिडीत आपल्या न्याय मागण्यांना घेउुन विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या नेतृत्वात गुरुवारी  ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता येथील जटपुरा गेट लगतच्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
शासनाच्या चौकशी अहवालाच्या अनुषंगाने वादग्रस्त तोतया कर्मचारी ‘मंडळ निरीक्षकावर’ तातडीने एमआयआर दाखल करावा, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील नोंदीत सुरक्षा रक्षकाचे गत २२ महिन्यांचे वेतन व लेव्ही संदर्भातील वसुलीची कारवाई तातडीने करावी, १०३ नोंदीत सुरक्षा रक्षकांना मंडळामार्फत विविध आस्थापनामध्ये तातडीने सुपर्द करावे, बिल्ट पेपर उद्योगातील नोंदित माथाडी कामगारांना मंडळामार्फत कामाच्या आणी लेव्ही व वेतनाच्या संदर्भातील वसुलीची कारवाई करावी, बिल्ट येथील नोंदीत माथाडी कामगारांच्या वसुलीदाव्या संदर्भात जाणीवपूर्वक प्रलंबित दावा सुनावणी संघटनेच्या उपस्थित घ्यावी, चंद्रपूर येथील रेल्वे माल धक्यावरील कामगारांना मंडळ कंत्राटदार व कामगा यांच्यात झालेल्या कराराप्रमाणे तातडीने वेतन मिळावे व कराराची तंतोतंत अंमलबजावणी व्हावी, मंडळ निरीक्षक कुरेशीद्वारे षडयंत्र करुन कामावरुन काढलेल्या अनिल जुनघरे यांना पूर्ववत मागील वेतन व लेव्हिसह कामावर घेण्याचे निर्देश त्वरीत देण्यात यावे, बेकायदेशीरपणे सेवाजेष्ठता डावलून आणि सुरक्षा रक्षक मंडळाची प्रतिक्षा यादी डावलून कुरेशीद्वारे करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराची चैकशी करुन रामदास मिलमिले याची अवैधपणे केलेली नियुक्ती तातडीने रद्द करावी आदींसह विविध मागण्यांना घेउुन पिडीत कामगार विदर्भ प्रहार संघटनेच्या नेतृत्वात एक दिवसीय धरणे आंदोलनावर बसणार आहेत.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.