Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर २५, २०१७

अद्याप एकाही शेतक-याला कर्जमाफी नाही

रामटेक तालुक्यांत दहा हजारावर आॅनलाईन अर्ज

रामटेक/ प्रतिनिधी-राज्य सरकारने कर्जमाफी केली असली व ही आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचे सरकारतर्फे वेळोवेळी जाहीर करण्यांत येत असले तरी रामटेक तालुक्यांत अद्याप एकाही षेतक-याची कर्जमाफी झाली नसल्याचे विदारक चित्र आहे. अलिकडे रामटेकच्या आमदारांच्या हस्ते रामटेकच्या कृशि उत्पन्न बाजार समीतीच्या कार्यालयांत महिनाभरापुर्वी काही षेतक-यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्शरीने जारी केलेले कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यांत आले मात्र त्यांनाही अद्याप कर्जमाफीचा लाभ झालेला नाही हे वास्तव आहे.
राज्य सरकारने कर्जमाफी केली खरी मात्र त्यासाठी अनेक निकश व अटी षेतक-यांवर लादण्यांत आल्या.यासाठी त्यांना आॅनलाईन अर्ज करण्याचा द्राविडी प्राणायाम या सरकारने करण्यास भाग पाडले.षेतक-यांनी विविध ‘आपले सरकार’ केंद्रावर तासनतास रांगा लावून कर्जमाफी होईल या अपेक्षेने अर्ज भरले.या केंद्रावरही षेतक-यांचा षे-पाचषे रूपयांनी खिसा रिकामा करण्यांत आला मात्र अद्याप एकाही षेतक-याची कर्ज रक्कम माफ झाल्याचे ऐकिवात नाही.याबाबत रामटेकच्या सहायक निबंधक भारती काटुळे यांना विचारले असतां त्यांनी सा्रगीतले की रामटेक तालुक्यातून सुमारे दहा हजारावर षेतकरी यांनी आॅनलाईन अर्ज सादर केले आहेत.यासाठी रामटेक तालुक्यात सुमारे 38 आपले सरकार केंद्रावरून त्यांना अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यांत आली होती मात्र त्यांनतर पात्र षेतकरी यांची यादी षासनाकडून पाठविण्यांत येणार होती.रामटेक तालुक्यातील सुमारे षंभरावर षेतक-याची यादी आॅनलाईन दिसत होती मात्र त्यात त्रुटया
असल्याने ती यादी नाकारण्यात आली असून सरकारकडून याबाबत नविन यादीची प्रतिक्षा सुरू असल्याचे त्यांनी सांगीतले.
षासनाने कर्जमाफी केली याचा गाजावाजा करण्यासाठी रामटेकच्या आमदारांच्या हस्ते रामटेकच्या कृशि उत्पन्न बाजार समीतीच्या कार्यालयांत काही निवडक षेतक-यांना बोलावून माननिय मुख्यमंत्री साहेबांचे हस्ताक्शर असलेले कर्जमाफीचे प्रमाणपत्र सहकार विभागाच्या नागुपर जिल्हयाचे उपनिबंधक सतीश भोसले यांच्या उपस्थितीत देण्यात आले व तषा बातम्याही प्रसिद्ध करण्यात आल्या मात्र अद्याप कर्जमाफी झाली नसल्याचे वास्तव आहे.
याबाबत मासलेवाईक उदाहरण असे की,मानापूरचे षेतकरी श्री हिरामन श्रीराम हिंगे यांचेकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे(विविध कार्यकारी संस्था,रामटेक) कर्ज खाते क्रमांक 152/3 अन्वये 75167 रूपये कर्ज थकीत होते.वर नमूद केलेल्या कार्यक्रमांत त्यांना सपत्नीक कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यांत आले मात्र प्रत्यक्षात बॅंकेत कर्जरकमेचा भरणा सरकारने केला नाही असे समजते.याबाबत जिल्हा उपनिबंधक सतीश भोसले यांना विचारणा केली असता ते म्हणाले की हे षासकीय काम आहे.रक्कम येण्यास कींवा तसे निर्देश येण्यासाठी काही कालावधी अजून लागू शकतो कर्जमाफी मात्र नक्की होणार आहे.आॅनलाईन याद्यांमध्ये ब-याच चुका झाल्याने त्यास विलंब होत आहे.नक्की कालावधी कीती लागेल हे सांगता येणार नसल्याचेही ते म्हणाले.
एकूणच कर्जमाफीचा लाभ प्रत्यक्श षेतक-यांना अद्याप रामटेक तालुक्यांत तरी झालेला दिसत नाहीये.माननिय मुख्यमंत्री यांनी सर्व अर्जदार षेतक-यांच्या खात्यात दिवाळीपुर्वी संबधित कर्जरकमेचा भरणा निश्चित होईल असे सांगीतले होते. षेतकरी कर्जमाफी कधी होते त्या दिवसाची आतुरतेने वाट बघत आहेत

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.