चंद्रपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चंद्रपुर शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे लक्ष जावं यासाठी खड्ड्यांचे श्राद्ध केले होते व आक्रमक भूमिका घेत थेट मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यालयात धडक देत त्यांना मुरूम व गिट्टी भेट देत रस्ते दुरूस्ती करिता १५ दिवसाचा अल्टीमेटम देखील देण्यात आला होता.
मनसेच्या आंदोलनाची आक्रमकता लक्षात घेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १५ दिवसाच्या आतच मूल महामार्ग व ट्रॅफिक ऑफिस समोरच्या रस्त्यांची दुरूस्ती सुरू केली व नागरिकांना खड्ड्यांपासून दिलासा मिळाला.
या आंदोलनात मनसे जिल्हा अध्यक्ष दिलीप रामेडवार, जिल्हा उपाध्यक्ष सचिन भोयर, मनविसे जिल्हा अध्यक्ष राहूल बालमवार व इतर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता.