Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर ०१, २०१७


 चंद्रपूर शहर महानगरपालिकेत इंदिरा गांधी स्मृतिदिन साजरा
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर शहर महानगरपालिका दिनांक 31 ऑक्टोंबर 2017 रोजी इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन म्हणून राष्ट्रीय संकल्प दिवस शासन निर्णय असल्याने महानगर पालिकेत साजरा करण्यात आला महापौर अंजली घोटेकर यांच्या हस्ते शहरात असलेल्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.यावेळी महापौर अंजली घोटेकर आपल्या भाषणात म्हनाल्या की भारताच्या पहिल्या पंतप्रधान होण्याचा गौरव इंदिरा गांधी यांना प्राप्त झालेला होता. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता असे मत त्यांनी भाषणाच्या वेळी व्यक्त केले.याप्रसंगी उप आयुक्त श्री देवडीकर ,सहाय्यक आयुक्त श्री सचिन पाटील , अंजली आंबटकर नोडल अधिकारी, श्री महेश काळे शहर चंद्रपुर, तुकडे मुख्य लेखाधिकारी नगरसेविका तसेच महापालिकेतील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.