Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर ०१, २०१७

वाढदिवशी रक्तदान करून युवकांपुढे ठेवला नवा आदर्श

चंद्रपूर/ (ललित लांजेवार )
                          चंद्रपूर येथील एका प्रसिद्ध वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी जितेंद्र रामचंद्र मशारकर यांनी आजाराने त्रस्त असलेल्या एका ९ वर्षीय अरफिया फिरोज खान पठाण या मुलीला रक्तदान करून आपला ३७ व वाढदिवस साजरा केला  ,पत्रकार जितेंद्र मशारकर हे दैनिक चंद्रपूर महासागर वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी आहेत. ह्यांनी या आधी देखील एक नव्हे,दोन नव्हे तर तब्बल ४८ वेळा आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करून इतरांपुढे एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.

                        गेल्या काही दिवसांपासून अरफ़ियाला एका आजाराने ग्रासले असून तिला प्रत्येक महिन्यात बाहेरून रक्तपुरवठा करावा लागतो.हल्ली वाढदिवस साजरा करण्याचे मोठ्या प्रमाणावर फॅड आलेले आहे. वाढदिवस कुटुंबात साधेपणाने साजरा केला, तर काहीच हरकत नाही. मात्र, अनेक लोक आपला वाढदिवस हजारो, लाखो रुपये  खर्च करून मोठमोठे बॅनर, कटआऊट लावून, मित्रमंडळी, कार्यकर्त्यांना मोठमोठ्या हॉटेल- धाब्यांवर रंगीत- संगीत भोजन घालून, रात्री बारा वाजता फटाक्‍यांची आतषबाजी करत अगदी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करताना दिसतात. अपवादाने कोठेतरी रुग्णालयात फळ वाटप, अंध शाळेत खाऊ, साहित्य वाटप केले जाते. मात्र, त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. अशा स्थितीत आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून पत्रकार जितेंद्र मशारकर ह्यांनी आपला वाढदिवस रक्तदान करून प्रत्येकवर्षी साजरा करू असा निश्चय केला असल्याने ते दरवर्षी आपल्या वाढदिवशी गरजू व्यक्तींना रक्तदान करून आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करतात. पत्रकार जितेंद्र मशारकर ह्यांनी केलेल्या या रक्तदानामुळे  हिंदू-मुस्लिमांमधील दरी मिटविली आहे,त्यामुळे रक्तदानाचा असा आदर्श युवापिढीसाठी प्रेरणा देणारा ठरणार आहे.Image may contain: 2 people, people standing and child

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.