चंद्रपूर/प्रतिनिधी:
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीव्दारा राज्यभर सुरू असलेल्या संत गाडगेबाबा प्रबोधन अभियानाअंतर्गत प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर, मा.सा. कन्नमवार सभागृह मूल, पंचशील वसतिगृहाचे प्रांगण ब्रम्हपूरी येथे दि. 11, 12 आणि 16 नोव्हेंबर रोजी साय. 6 वाजता वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया आणि जादूटोणा विरोधी कायदा या विषयांवर अ. भा. अंनिसचे संस्थापक संघटक व PIMC, महाराष्ट्र शासनाचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव जाहिर व्याख्यान होणार आहे.
सदर व्याख्यानात खरे
1. संत आणि ढोंगी बाबा कसे ओळखायचे?
2. स्त्रिया बाबांच्या नादी का लागतात?
3. सर्वच बाबा स्त्रियांचं लैगिक शोषण करतात का?
4. स्त्रियांना यातून वाचविण्यासाठी जादूटोणा विरोधी कायद्यात काय तरतुद आहे?
या विषयावर चमत्कार प्रात्यक्षिकांसह सखोल मार्गदर्शन होणार आहे. या व्याख्यानाला जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.