Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, नोव्हेंबर २४, २०१७

नियंत्रण सुटल्याने बस कलंडली,10 विद्यार्थी किरकोळ जखमी

रामटेक / प्रतिनिधी -रामटेक -नेरला बस प्रवासी घेवून जातांना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने रामटेकच्या कीट्स अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ भरघाव बस रस्ता सोडून खाली घरंगळली व त्यामुळे बसमधून प्रवास करीत असलेल्या सुमारे 10 विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली.ही घटना सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडल्याचे पोलीसांनी सांगीतले.या घटनेत रस्त्याच्या कडेला असलेली दुचाकी मात्र बसच्या आघाताने चकनाचूर झाली.
                              सविस्तर वृत्त असे की रामटेक -नेरला ही बस क्रमांक एम एच-07,स-7518 आज नेहमीचा चालक व वाहक सुटीवर असल्याने उषीरा रामटेक बसस्थानकावरून सुमारे 5.45 वाजता सुटली.अपघातस्थळ हे बसस्थानकापासून सुमारे दीड कीमी अंतरावर आहे.याठीकाणी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व बस आपल्या भरधाव वेगात रस्ता सोडून डाव्या बाजुला घुसली.या घटनेत 10-12  विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली.घटनेची माहीती मीळताच रामटेकचे पो.नी योगेश पारधी यांनी पोलीस  कर्मचारी यांचेसह घटनास्थळ गाठले. जखमी यांना रामटेकच्या उपजिल्हारूग्णालयांत दाखल करण्यात आले व काही जखमी यांना नजिकच्या डाॅ.पाठक यांच्या किमया ईस्पितळांत भरती करण्यांत आल्याचे पोलीसांनी सांगीतले.
बसचा चालक एस आर चहांदे याचे नियंत्रण सुटल्याने घटनास्थळी रस्त्याच्या कडेला सिंधरागीरी पतसंस्थेचे दैनिक बचत एजंट मनोहर हत्तीठेले हे आपली बाईक पल्सर क्रमांक एम एच 40,क्यू-9954 ठेवून हाॅटेल सम्राट येथे कलेक्षन करण्यासाठी गेले होते त्यामुळे ते बचावले मात्र त्यांचे उपरोक्त वाहन चकनाचूर झाले आहे.
सुदैवाने कुठलीही प्राणहानी झाली नाही.सदर बसचा चालक हा दारू पीउन होता अषी चर्चा लोक करीत होते.रामटेक पोलीसांनी याप्रकरणी चालकाविरूद्ध विविध कलमांखाली गुन्हा नोंदविला असून रामटेक पोलीस अधिक तपास करीत आहेत




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.