Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑक्टोबर ३१, २०१७

आॅनलाईन फ्राॅड करुन पैश्याची फसवणुक करणाऱ्याला चंद्रपूर पोलीसांकडून अटक

चंद्रपूर/प्रतिनिधी:(लालित लांजेवार)
दिनांक 06 सप्टेंबर 2017 रोजी रात्रो दरम्यान फिर्यादी सौ. त्रिरत्ना नारायण मेश्राम रा. नगीनाबाग चंद्रपूर हयांनी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे तक्रार नोंदविली कि, कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीचे बॅंक आॅफ इंडिया येथील खात्याच्या एटीएम कार्डचे 16 अंकी नंबर व पासवर्ड वापरून फिर्यादीचे खात्यामधुन 15,945/-रू चे आॅनलाईन शॉपिंग करून तिची फसवणुक केली आहे. यावरून पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे अपराध क्रमांक 1473/2017 कलम 420 भादंवि चा गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा हा तांत्रिक स्वरुपाचा असल्याने गुन्हयाचा पुढील तपास सायबर सेल चंद्रपुर कडे सोपविण्यात आला.

श्रीमती नियति ठाकर, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, आणि श्री. हेमराजसिंह राजपुत अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोउपनि श्री. विकास मुंढे व सायबर सेल चंद्रपूरचे पथकाने सदर प्रकरणातील फिर्यादीचे खात्यामधुन झालेल्या आर्थिक व्यवहाराचे तांत्रिक विष्लेशण करून प्राप्त पुराव्याच्या आधारे उत्तर प्रदेशातील मऊ जिल्हयातील अनुपार मठिया येथील काही नवयुवकांनी सदर अपराध केल्याचे निश्पन्न झाल्याने सायबर सेल येथील पथकाने उत्तर प्रदेश येथे जावुन त्या गुन्हेगारापैकी एका युवकास ताब्यात घेवुन सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

 सदर आरोपी कडुन 3 मोबाईल, 9 सिम कार्ड आणि 4 मेमोरी कार्ड जप्त करण्यात आले आहे. आरोपीस गुन्हया संबंधाने विचारपुस केली असता त्यांने सांगीतले की, ज्यावेळी एखादा इसम एटीएम मधुन पैसे काढण्यासाठी उभे असतात त्यावेळी बरेच लोक एटीएम कार्ड हातात घेवुन उभे राहतात, तेव्हा आरोपी व त्याचे साथीदार हे एटीएम मध्ये उभे राहुन लोकांच्या हातात असलेल्या एटीएम कार्ड चे 16 अंकी नंबर, एक्सपायरी डेट, नांव इत्यादी पाहुन ते पाठ करून घेतात किंवा त्यांच्याकडील छोटया मोबाईलमध्ये नंबर डायल करुन घेतात व त्यानंतर सदर इसम एटीएम मध्ये पैसे काढण्याकरीता 04 अंकी पासवर्ड पिन टाकत असतांना त्यांचे मागे राहुन पासवर्ड सुध्दा पाठ करून घेतात. सदर प्रक्रीयेला सायबरच्या भाषेत SHOULDER SURFING AND SKIMMING CRIME म्हणुन संबोधले जाते.

गुन्हेगाराकडुन एटीएम कार्डचा 16 अंकी नंबर, एक्सपायरी डेट, नांव, पासवर्ड ई. प्राप्त झाल्यावर आॅनलाईन पैश्याची अफरातफर करणे सोयीचे होते. आणि याच पद्धतीचा वापर करून सदर गुन्हा केल्याचे आरोपीने प्राथमिक तपासात कबुली दिली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने प्राथमिक तपासात त्याचे साथीदाराचे नाव सांगीतले आहे, सद्या आरोपी हा 05 दिवसाच्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये असुन गुन्हयाचा अधिक तपास सुरू आहे.


एकंदरीत सदर गुन्हयाचे प्राथमिक तपासात ही बाब प्रामुख्याने निर्दशनास येते की, सर्वसामान्य लोकांकडुन एटीएम चा वापर करतांना विविध बैंके कडुन निर्गमित सुचनांचे योग्य पालन न केल्यामुळे, एटीएम मध्ये अगोदर असलेल्या इसमांचे व्यवहार पुर्ण होण्याअगोदरच आंत जावून गर्दी करणे, एटीएम मध्ये निश्काळजीपणाने वापर केल्यामुळे, एटीएम मशीनमध्ये पासवर्ड टाकतांना किंवा कार्ड स्वाईप करते वेळेस आजु-बाजुस छुपा कॅमेरा किंवा एखादा इसमांची नजर असु शकते याचे भान न ठेवणे ईत्यादि प्रकारचा गुन्हेगारांकडुन अभ्यास होवून अशा प्रकारचे गुन्हे करतात.

तरी, याद्वारे सर्व नागरीकांना पुनश्च आवाहन करण्यात येते की, बैंक व्यवहार/एटीएम व्यवहार/ आॅनलाईन शॉपिंग /दुकानातील स्वाईप कार्ड शॉपिंग करतांना काळजीपूर्वक आर्थिक व्यवहार करावा. तसेच फोनद्वारे कोणासही एटीएमचा 16 अंकी नंबर, सीवीवी नंबर आणि नंतर ओटीपी देण्यात येवू नये. तसेच एटीएम कार्डचे पासवर्ड पिन चेंज केले नसेल त्यांनी त्वरीत सदर पिन चेंज करावे. सर्वांनी त्यांच्या प्रत्येक आॅनलाईन अॅकाऊन्टचा पासवर्ड दर तिन महिण्याने नियमित चेंज करावेत. जेणे करुन आपल्या कडुन होणाऱ्या आंशीक चुकांचा गुन्हेगारांनी फायदा घेवू नये.असे आवाहन चंद्रपूर पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.