चंद्रपूर/प्रतिनिधी;-
गेल्या अनेक वर्षापासून स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारे विदर्भवादी संघटना पुन्हा एकदा वेगड्या मागणीसाठी समोर आली आहे. विजेच्या प्रश्नांना घेऊन आज विदर्भ राज्य आंदोलन समितीने चंद्रपुरात भव्य बाईक रॅली काढत विविध मागण्यासाठी महाऔष्णिक वीज केंद्राच्या मेजर गेट समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यात स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती तात्काळ करावी,शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी लवकरात लवकर करण्यात यावी,विदर्भातील जनतेसाठी विजेचे वीज दर निम्यावर आणा,लोडशेडिंग संपवा,कृषी पंपाचे वीज बिल संपवा,विदर्भातील नवीन कोळसा आधारित १३२ वीज प्रकल्पाची मान्यता रद्द करा,महिलांवरील मायक्रो फायनान्स चे कर्ज तात्काळ संपवा, मागील निवडणुकांमध्ये भाजपने जनतेला आश्वासन दिले होते कि आम्ही सत्तेत आल्यानंतर वेगळा विदर्भ देऊ ते आश्वासन कधी पूर्ण करणार? असा प्रश्न हि यावेळी विचारण्यात आला आहे. सोबतच विविध मागण्यांना घेऊन आज विदर्भ राज्य आंदोलन समितीने चंद्रपुरात भव्य बाईक रॅली काढत महाऔष्णिक वीज केंद्राच्या मेजर गेट समोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनांत विदर्भवादी नेता व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.