Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर २५, २०१७

धावता ऑटो उलटला; १ ठार तर ९ प्रवासी गंभीर जखमी


चंद्रपुर/पोंभुर्णा:
पोंभुर्णा -मूल महामार्गावरील देवडा खुर्द जवळील शासकीय धान्य गोदामजवळ ऑटो उलटल्याने एका चा मृत्यु तर ९ प्रवासी जखमी झाले. मंगळवार हा पोंभुर्णा तालुक्याचा आठवडी बाजार तालुक्यातील प्रवासी बाजार करण्याकरीता ह्या मार्गावरील ऑटो ने- जा करतात बाजारासाठी आलेले प्रवासांना घेऊन जात असताना ही घटना घडली.

             मूल मार्गे एस.टी.विरुद्ध दिशेने येत असताना प्रवासी घेऊन जात असलेला तिन चाकी वाहन भरधाव वेगाने असल्याने साईट मारताना ब्रेक निकामी झाल्याने ऑटो उलटला यात १ प्रवाशाच्या मृत्यु झाला तर ९ प्रवासी जखमी झाले आहेत यात नथू आलम (वय ५५ ) रा.जामतूकूम हा प्रवासी गंभीर जखमी होता त्याला तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात हलवण्यात आले रस्त्यातच त्याची प्राणजोत मावळली. तर या अपघातात इतर प्रवाशांच्या डोक्‍याला, हाताला, पायाला जबर मार लागला. जखमी प्रवाशांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. तर काहींना पुढिल उपचारासाठी जिल्हा रुग्नालय चंद्रपुर येथे हलविन्यात आले आहे .
            अपघातातील जखमींची झाल्यापैकी उज्वला भगके वय २९ रा.देवाडा खुर्द , अविनाश भडके वय ३० रा.चेक कोंसबी, उषा मानकर वय २८ रा.पोंभुर्णा,अपर्णा कन्नके वय २७ रा.जामतूकूम या मध्ये लहान बालक शाश्वत पेंदोर वय ४ वर्ष व इतर प्रवासी जखमी झाले आहे तर काहीना चंद्रपुरला सामान्य रूग्णालयात हलवण्यात आले आहे.पुढील तपास पोंभुर्णा पोलीस करीत आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.