Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑक्टोबर २३, २०१७

चंद्रपूर जिल्ह्यात बंदी झुगारुन वाहनगावात दारू सुरु करण्याचा प्रयत्न

प्रयत्न
                                      वाहनगाव येथील दारू दुकान फलकासमोर झालेली गर्दी.                           
प्रतिनिधी/ चंद्रपूर - जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली खरी. पण, ही बंदी प्रभाविपणे राबविण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. दारूबंदी असताना वाहनगाव ग्रामपंचायतने आधी दारूविक्रीची परवानगी मागणारा ठराव आणि त्यांनंतर दारू दुकानासाठी नोकर भरतीची जाहिरात काढून खळबळ उडवून दिली होती. आता तर चक्क देशी - विदेशी दारू दुकान सुरु केल्याचा फलक लावून राज्य शासनाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. हा फलक गुरुद्वाराजवळ लावण्यात आल्याने गावात तणावही निर्माण झाला आहे . 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.