Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर ११, २०१७

रेल्वेतून ८० हजाराची दारू जप्त


चंद्रपूर/प्रतिनिधी: - ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर रेल्वे मार्गाने होणारी अवैध दारू तस्करी रेल्वे पोलिसांनी (आरपीएफने) जप्त केली आहे.नागपूर आरपीएफ आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी दिलेल्या माहिती नुसार व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चंद्रपूर रेल्वे पोलिसांनी जयपूर - म्हैसूर एक्सप्रेस व नवजीवन एक्सप्रेसमध्ये  दारू तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या  माहितीच्या आधारे तपासणी केली गेल्यावर ३११० बॉटल दारू जप्त करण्यात आली या जप्त केलेल्या दारूची किंमत ८० हजार रुपये इतकी सांगण्यात येत आहे.हि दारू पकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाला सुपूर्त करण्यात आली.

  सदरची कार्यवाही आरपीएफ पोलीस निरीक्षक ठाकूर यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक बारले,अरविंद मोरे ,योगेश रेकूळवाळे,अंतीं सिरसाठ यांच्या सहयोगात पार पडली

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.