Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, सप्टेंबर २३, २०१७

मराठी मराठी खेळू

चल राजकारण्या आपण
मराठी मराठी खेळू

स्वार्थापायी मराठीला नग्न तुम्ही केलं
सत्तेपायी मराठीला भग्न तुम्ही केलं
भावनेचा खेळ हा भावनेशी खेळू
चल राजकारण्या आपण.......मराठी मराठी खेळू

हिंदी माझी माय आणि मराठी माझी मावशी
ना घर कि ना घाट कि मावशी आजच्या दिवशी
देशोधडी लावू तिला अशी हळूहळू
चल राजकारण्या आपण.......मराठी मराठी खेळू

परप्रांतीयांचा येथे वाहतो सुसाट वारा
माय माउली मराठीला नाही येथे थारा
मुकेपणी मराठीचे आसू लगे गळू
चल राजकारण्या आपण.......मराठी मराठी खेळू

मराठी अस्मितेचा भगवा हा रंग
राजकारणात मग झाला की हो दंग
पाठीमागे मराठीची पाठ लागे पोळू
चल राजकारण्या आपण.......मराठी मराठी खेळू

मराठी नेत्यांचा हा जुनाच आजार
मराठी मतांचा मराठी बाजार
राजकारणाचा धागा लोका लागे कळू
चल राजकारण्या आपण.......मराठी मराठी खेळू

राजकारणात जसा शिरकाव झाला
मराठीचा नवा सुरु लपंडाव झाला
त्यांचा झाला खेळ आणि देश लागे जळू
चल राजकारण्या आपण.......मराठी मराठी खेळू

मराठी जपून मनी अरमान करू
मराठीच ही नव निर्माण करू
मराठीचा गड आता लागलाय ढळू
चल राजकारण्या आपण.......मराठी मराठी खेळू



                                    भिमराव तांबे
                              आदर्शगाव दानोळी,कोल्हापूर
                             📱 8691918025

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.