Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जून ०४, २०१६

दोन शब्द.. राजीनाम्याविषयी...

- एकनाथराव खडसे

  • Ø माझ्यावर ज्यांनी आरोप केले, मात्र त्यांनी पुरावे दिले नाहीत.
  • Ø गेल्या ४० वर्षाच्या राजकीय जीवनात मी अनेक पदं भूषविली,
  • पण यापूर्वी असा ‘मिडीया ट्रायल’ चा अनुभव कधी घेतला नव्हता.
  • Ø पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या जमिनीचा बनावट कागदपत्रांच्या आधारे केलेला टी.डी.आर. घोटाळा उघडकीस आणला. एफ्.आय.आर. दाखल करायला लावला शासनाची गेलेली टी.डी.आर. वगैरे धरून रु.४०० कोटी मुल्याची जमीन शासनास परत मिळवून दिली.
  • Ø मंत्री झाल्यानंतर मंत्रीमंडळ तसेच विधी मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत जनहिताचे ११९ निर्णय घेतले.
  • Ø भोसरी, पुणे येथील एमआयडीसी च्या जमिनीचा मोबदला ४८ वर्षानंतर या क्षणापर्यंत मूळ मालकाला दिला गेला नाही. या जमिनीचा निवाडा झालेला नसल्याचे व भूसंपादन अपूर्ण असल्याने भूसंपादन प्रक्रिया नव्याने राबविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, एम.आय.डी.सी. यांच्या अहवालात नमूद आहे. सदरचा व्यवहार बेकायदा व नियमबाह्य नव्हे; तर, तो दोन व्यक्तीमधील (Person to Person) असा कायदेशीर व्यवहार आहे. या संबंधीचे सर्व पुरावे सविस्तरपणे दिले. मात्र, त्याला प्रसिध्दी न देता माझ्यावर एकांगी आणि निराधार आरोप करण्यात आले.
  • Ø येरवडा, पुणे येथील खाजगी बिल्डरने हडप केलेली १० एकर जमीन शासनास परत मिळवून दिली.
  • Ø वक्फ बोर्डाच्या जमिनीवर झालेली बेकायदा अतिक्रमणे काढून ती जमीन वक्फ बोर्डाकडे परत मिळावी म्हणून निर्णय घेतला.
  • त्यामुळे अनेक जण दुखावले गेले.
  • Ø महाराष्ट्रात भाजपाच्या हितासाठी, पक्षाच्या विस्तारासाठी मी काम केलं आहे.
  • Ø माझ्यावरील आरोप सिध्द झाल्यास मी मंत्रीपदावरच काय, राजकीय जीवनातून माघार घेईन. पण अधिकृत पुरावे सादर करा. बिनबुडाचे, निराधार आरोप करु नका, असे मी वारंवार म्हटले आहे. निराधार आरोपांमुळे भाजपा आणि राज्य सरकार बदनाम होत आहे.
  • Ø हॅकर म्हणजे चोर. त्यावर प्रसार माध्यमांनी विश्वास ठेवला, पण माझ्यावर नाही. मी दिलेल्या पुराव्यावर त्यांचा विश्वास नाही.
  • Ø मला बदनाम करणाऱ्यांचीही चौकशी करा. मा.मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
  • Ø माझ्यावरील आरोपांच्या बातम्या देतांना माध्यमांनी पुरावे छापले असते, तर मला आनंदच झाला असता.
  • Ø मी भरपूर लेखी पुरावे दिले. माझ्या web site (www.nathabhau.com) वर ते उपलब्ध करुन दिले. लेखी खुलासे केले. मात्र, ते न छापता, प्रसिध्दी माध्यमांनी कट केल्याप्रमाणे मला बदनाम करण्यासाठी माझ्यावर शरसंधान केले.
  • Ø भाजपानं नैतिक मूल्यांचं नेहमीच पालन केलं आहे.
  • Ø माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपातून जोपर्यंत मी मुक्त होत नाही, तोपर्यंत मी मंत्री पदावर राहणार नाही.
  • Ø आरोप करणाऱ्यांना केवळ माझा मानसिक छळ करायचा आहे. भाजपाला आणि मला बदनाम करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे. Ø या सर्व घडामोडीत भाजप माझ्या पाठीशी राहिला, त्याबद्दल भाजपचे आभार. आणि यापुढेही पक्ष माझ्या पाठिशी राहील, असा मला विश्वास आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.