Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑक्टोबर १७, २०१५

द्धाने केला पत्नाी, भाचाचा खून

नागपूर-चारित्र्यावरील संशयातून ६० वर्षीय वृद्धाने पत्नाी आणि मेहुण्याच्या मुलाचा कुर्हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तक्षशीलानगर येथे शुक्रवारच्या रात्री ३ च्या सुमारास घडली. या घटनेमुळे वस्तीमध्ये शोककळा पसरली आहे. पोलिसांनी आरोपी शरनू उर्फ अन्नाजी कांबळे यास अटक केली आहे.
गोपीबाई शरनू उर्फ अन्नाजी कांबळे (५०) आणि चेतन मधुकर रामपुरे (१०) अशी मृतकांची नावे आहेत. अन्नाजी कांबळे यास दारुचे व्यसन असून तो हातमजुरीचे काम करतो. तर गोपीबाई बाजारांमध्ये भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करायची. त्यांना तीन मुली असून तिघिंचेही लग्न झाले आहे. त्यांच्या तीनही मुली पुणे येथे राहतात. घरात दोघेच म्हातारे असल्याने गोपीबाई यांनी त्यांचा भाऊ मधुकर रामपुरे रा. उमरगांव (उस्मानाबाद) यांचा मुलगा चेतन यास दोन वर्षांपूर्वी नागपुरात आणले. तो नारी वस्ती येथील महापालिकेच्या उच्च प्राथमिक शाळेत चौथ्या वर्गात शिकत होता. अन्नाजी हा दररोज दारु पिऊन दररोज घरी यायचा आणि गोपीबाई यांच्याशी भांडण करायचा. काल शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास गोपीबाई भाचा चेतनसोबत वस्तीतील दुर्गादेवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यानंतर ते घरी परतले असता अन्नाजी याने गोपीबाईशी भांडण केले. आज पहाटे पाचच्या सुमारास शेजारचे काही परिवार कोराडी येथील देवीच्या दर्शनाला जाणार होते. त्यांच्यासोबत गोपीबाई ‘ाा चेतनला घेऊन जाणार होत्या. त्याची माहिती रात्रीच अन्नाजीला दिली होती. त्यामुळे अन्नाजी हा गोपीबाईवर रागावलेला होता. दरम्यान पहाटे तीन वाजेच्या सुमारास सर्वजन झोपेत असताना अन्नाजीने गोपीबाईच्या मानेवर कुर्हाडीचे घाव घातले. त्यामुळे गोपीबाई किंचाळली असता चेतन झोपेतून उठला. त्यानंतर चेतनही किंचाळून दरवाजा उघडून बाहेर पळण्याचा प्रयत्ना करीत असताना अन्नाजीने त्याच्यावरही कुर्हाडीने वार केला. कुर्हाडीच्या घावाने दोघेहीजण जागीच ठार झाले. गोपीबाई आणि मुलाच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून शेजारचा अमित गणेश भगत (२५) आणि त्याच्या घरातील सदस्य उठले. त्यांनी गोपीबाईचा दरवाजा ठोठावला असता अन्नाजीने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच अमित हा घरात शिरला असता त्याला गोपीबाई आणि चेतन जमीनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि अन्नाजीच्या हातात कुर्हाड होती. अन्नाजी अशात अवस्थेत घराच्या उंबरठ्यावर बसून काही वेळ बसून होता. त्यानंतर अमितने ताबडतोब जरीपटका पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून खुनाचा गुन्हा नोंदविला आणि अन्नाजीला अटक केली. गोपीबाईच्या मुली, जावई आणि चेतनचे आईवडिल रात्री उशीरा नागपुरात पोहोचले. तोपर्यंत त्यांचे मृतदेह मेयो रुग्णालयाच्या शवविच्छेदन केंद्रातच पडून होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.