नागपूर : सप्टेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायतींसाठी उद्या, मंगळवारी (ता. 4) मतदान होत आहे. त्यासाठी 42 झोनअंतर्गत 484 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील उमरेड, भिवापूर, कुही, मौदा, रामटेक, पारशिवनी, सावनेर, नरखेड, काटोल, कळमेश्वर, हिंगणा, कामठी व नागपूर ग्रामीण या तालुक्यांतील 129 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मंगळवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होईल. संपूर्ण ग्रामपंचायत निवडणूक बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी म्हणून अपर पोलिस अधीक्षक अमित काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्याही मतदार केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, याकरिता पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. बंदोबस्तादरम्यान पोलिस ठाणेनिहाय प्रत्येक मतदान केंद्रावर पाळत ठेवण्यासाठी गस्त घालण्यात येईल. एकूण 22 पोलिस ठाण्यांतर्गत सुरक्षेसाठी कर्मचारी तैनात करण्यात येतील. यात सहा उपविभागीय पोलिस अधिकारी, 15 पोलिस निरीक्षक, 51 सहायक व पोलिस उपनिरीक्षक, 771 पोलिस कर्मचारी, एसआरपीएफचा समावेश आहे.
चंद्रपूर 610 ग्रामपंचायतींत मतदान
11 हजार 134 उमेदवार रिंगणात
जिल्ह्यातील 610 ग्रामपंचायतींत उद्या (ता. 4) निवडणूक होत आहे. तब्बल 11 हजार 134 उमेदवार रिंगणात असून, त्यांचा भाग्याचा फैसला शुक्रवारी (ता. चार) लागणार आहे.
जिल्हा प्रशासनाने निवडणुकीसाठी दोन हजार 150 मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. निवडणूक काळात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिस विभागाने मतदानासाठी 3 हजार पोलिस, 800 होमगार्ड, एसआरपीएफच्या सहा तुकड्या आणि जिल्ह्याबाहेरून 800 कर्मचारी आणि 50 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात सात उपविभाग तयार करण्यात आले असून, या ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यात सुमारे 76 असंवेदनशील केंद्रे आहेत. यासाठी वेगळे पथक तयार केले आहे. तसेच 74 सेक्टर आणि 28 ट्रॅकिंग फोर्स गठित करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार नामनिर्देशन मागविण्यात आले होते. 13 हजार 567 उमेदवारांनी सादर केलेल्या नामनिर्देशनाची छाननी करण्यात आली. त्यात 358 अर्ज अपात्र ठरले. दोन हजार 561 उमेदवारांनी आपले नामांकन मागे घेतले. सध्या 11 हजार 134 उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज मागे घेतल्याच्या तारखेनंतर प्रचाराला चांगलाच जोर चढला होता. उमेदवारांनी मतदारांना विविध आमिषे दाखवून आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात होईल.