Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, एप्रिल १०, २०१५

तिघांच्या खून प्रकरणी ४ ताब्यात

नागपूर - तीन सख्ख्या भावांना भोसकून ठार केल्याची घटना गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास सक्करदर्‍यातील भांडेप्लॉटमध्ये घडली. यामुळे परिसरात मध्यरात्रीपर्यंत प्रचंड तणाव होता. या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली.
एकनाथ उगले (३५), संजय उगले (३२) आणि केशव उगले (३0) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघे बिडीपेठमध्ये राहात होते. एकनाथ हा अट्टल गुन्हेगार होता. चार वर्षांपूर्वी तो कारागृहातून बाहेर आला. त्यानंतर एका कुख्यात गुन्हेगाराचा तो जुगार क्लब चालवायचा. त्याच्यासोबतच संजय आणि केशवही हेच काम करायचे. परिसरातील एका कुख्यात गुन्हेगाराशी त्यांचे काही दिवसांपासून बिनसले होते. त्यावरून खून झाला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.