चंद्रपूर- आगार व्यवस्थापक राजीव राऊत व मोतीसिंग चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. तीन महिन्यांच्या निलंबन कालावधीनंतर तक्रारकर्त्या वाहकाने 12 फेब्रुवारीला आगार व्यवस्थापक राजीव राऊत यांची भेट घेऊन सेवेत रुजू करण्याची विनंती केली. त्या वेळी राऊत यांनी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर पीडित वाहकाने यासंदर्भात चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. राऊत यांनी तडजोडीअंती ठरलेली तीन हजार रुपयांची लाच मोतीसिंग चव्हाण या चालकामार्फत स्वीकारण्याचे कबूल केले.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
शुक्रवार, फेब्रुवारी २७, २०१५
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments

