Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, नोव्हेंबर २८, २०१४

भिसीत आज "दोन घास सुखाचे' नाट्यप्रयोग

डॉ. प्रकाश आमटे चित्रपटातील कलावंतांचा सत्कार


भिसी (जि. चंद्रपूर), : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या "डॉ. प्रकाश आमटे' चित्रपटातील कलावंतांचा सत्कार सोहळा शाहीर दादाजी भोयर फाउंडेशनच्या वतीने उद्या ता. 29 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजता भिसी येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानंतर अनिरुद्ध वनकर लिखित, खेमराज भोयर दिग्दर्शित लोकजागृती वडसा निर्मित "दोन घास सुखाचे' या नाटकाचा प्रयोग सादर होईल.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते कादर शेख, अहमद शेख, अनिरुद्ध वनकर, कुणाल गजभारे, नयना सोनवणे, खेमराज भोयर यांचा सत्कार होईल.
भिसी येथील आदर्श जनता विद्यालयाच्या रंगमंचावर होणाऱ्या या नाटकात अनिरुद्ध वनकर, फिल्म आशियाना व डॉ. प्रकाश आमटे चित्रपटातील कुणाल गजभारे, नयना सोनवणे, महेंद्र गोंडाणे, खेमराज भोयर, मा. संजीव, मंगेश मेश्राम, क्राईम पेट्रोलमधील कुणाल कपूर, ज्योती खुणे, कु. दीपाली, सौ. भारती (नागपूर), बालकलावंत शेषराज जिभकाटे, अंजली गोंडाणे यांचा समावेश आहेत, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक यशवंत भोयर यांनी दिली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.