Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर ०५, २०१४

वनरक्षक भरती प्र्रक्रीया रद्द करा - बंडु धोतरे

वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेकडे मागणी - 
वनरक्षक पदाकरिता 12 विज्ञान गणीतसह उत्तीर्ण अटीचा विरोध


चंद्रपूरः चंद्रपूर सह इतरही जिल्हयात वनविभागातील वनरक्षक पदाकरिता भरती प्रकीया सुरू आहे. वनरक्षक पदाकरिता शैक्षणीक पात्रता 12 विज्ञान गणीत विषयासह उत्तीर्ण होण्याची अट घातली गेली आहे. ही शैक्षणीक अट मागे घेण्यात यावी व सुरू असलेली भरती प्रक्रीया रद्द करण्याची मागणी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी राज्याचे वनमंत्री मा. सुधीर मुनगंटीवार यांचेकडे निवेदनातुन केली आहे.

वनरक्षक पदाकरिता पुर्वी 12 वी कुठलाही शाखेचा उत्तीर्ण ही शैक्षणीक पात्रता होती. 4 जुन 2014 रोजी शासन अधिसुचने नुसार वनरक्षक पदाकरिता 12 वी विज्ञान शाखेचा तोही गणित विषयासह उत्तीर्ण असण्याची जाचक अट ठेवण्यात आलेली आहे. यामुळे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदीया व यवतमाळ या जिल्हातील ग्रामीण, आदीवासी व दुर्गम भागातील विद्याथ्र्यावर अन्याय आहे. जे या जंगलभागातील गाव-खेडयात अत्यंत कठीण परिस्थीतीत आपले शिक्षण पुर्ण करित आले आहे. ज्यांना जंगलाप्रती प्रेम आहे, वनांच्या संरक्षणात चांगले योगदान देऊ शकतात, जे जंगलभागतच जिवण जगत आलेले आहे असे विद्यार्थी या शैक्षणीक अटीमुळे स्पर्धेत उतरू शकणार नाही.

या जिल्हयातील ग्रामीण भागातील विद्यार्थी कसे-बसे आर्ट-काॅमर्स मध्ये आपले शिक्षण पुर्ण करतो. विज्ञान शाखेत फार कमी विद्यार्थी शिक्षण घेतात, त्यातल्या त्यात गणीत विषयाची अट टाकल्याने हा ग्रामीण व स्थानीक विद्यार्थी या भरतीपासुन दुर आहे. आधीच रोजगाराच्या संधी फार कमी झालेल्या आहेत. 12 वी आर्ट-काॅमर्स च्या विद्याथ्र्याना वनभरती व पोलीसभरती देण्याची ओढ असते. त्याकरीता कित्येक दिवस-महिने शारीरीक क्षमता वाढीकरीता अभ्यास करित असतात. अचानकपणे शैक्षणीक पात्रता बदलामुळे या स्थानीक व गा्रमीण युंवकाचा हिरमोड झालेला आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्याचे वनमंत्री मा ना सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना इको-प्रो च्या शिष्टमंडळाने अध्यक्ष बंडु धोतरे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करित सदर भरती प्रक्रीया तात्काळ रद्द करण्याची मागणी केलेली असुन शैक्षणीक पात्रतेची अट रद्द करण्याची मागणी कलेली आहे.

यावेळी इको-प्रो चे नितीन रामटेके, विजय हेडाऊ, सुजीत घाटे, निशांत चहांदे, सुमीत कोहळे, राजु काहीलकर, राहुल विरूटकर आदी कार्यकर्ते इको-प्रोच्या शिष्टमंडळात सहभागी होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.