Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर १९, २०१४

आनंदवन दौरा

ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्या अध्यक्ष  21 नोव्हेंबर रोजी आनंदवनात 

चंद्रपूर दि.19- महाराष्ट्र राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष .सुर्यकांत गवळी हे 21 व 22 नोव्हेंबर 2014 रोजी चंद्रपूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून बाबा आमटे आश्रम आनंदवन वरोरा येथे भेट देणार आहे.
21 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे चंद्रपूर जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांसमवेत बैठक. त्यानंतर दुपारी 1 वा.पत्रकार परिषद असून त्यांचा दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपर्यंतची वेळ राखीव राहील. दुपारी 2.30 ते 3.30 पर्यंत बैठकीसाठी निमंत्रीत अधिकारी व ग्राहक चळवळीत काम करणा-या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधीसमवेत बैठक घेतील. त्यानंतर दुपारी 3.30 ते 4.30 पर्यंत जिल्हा ग्राहक मंचाची प्रत्यक्ष पाहणी, मंचाच्या अडीअडचणी व त्यावर उपाययोजना या संबंधी चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी 4.30 ते 5.30 पर्यत राखीव असून सांय.5.30 वा.बाबा आमटे आश्रम वरोराकडे प्रयाण कतील आणि वरोरा शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम राहील.
22 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 ते सायं.5.30 वाजेपर्यंत बाबा आमटे आश्रम आनंदवन वरोरा येथे भेट असून सांयकाळी 6 वाजता वरोरा येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.