Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मे १७, २०१४

पाचगांवात दारूबंदीचा ठराव पारीत

- महिला शक्तीचा एल्गार

ब्रम्हपुरी - तालुक्यातील पाचगांव येथील दोन बियर बार बंद करण्याचा ठराव महिला ग्रामसभेत एकमताने पारीत करून महिलांनी आपली शक्ती दारूविक्रेत्यांना दाखवुून दिली.


ब्रम्हपुरी तालुक्यातील पाचगांव हे 500 लोकसंख्येचे गांव असुन या छोटयाशा गावात प्रथमेश व विनायका हे दोन बियर बार आरमोरी येथील दिलीप जेठमल मोटवानी व प्रशांत मनोहर मोटवानी यांचे मालकीची आहेत. या बारमुळे गावातील अनेक संसार दध्वस्त झाले, अनेक युवक दारूच्या व्यसनी लागले, महीलांच्या छेडखानीचे प्रकार वाढले, ब्रम्हपुरी ते गडचिरोली हा महामार्ग असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असे असतांनाही मोटवानी यांनी नविन देशी दारू दुकान सुरू करण्याकरीता हालचाली सुरू केल्या. काही महीण्यापुर्वी महीलांनीच ग्रामसभेत नविन देशी दारू दुकानास परवानगी नाकारली व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारूमुक्ती अभियानाचे माध्यमातुन दोन्ही दारू दुकान बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क यांचेकडे केली. या मागणीकरीता श्रमिक एल्गारच्या अॅड. पारोमिता गोस्वामी व येथील सरपंच अरूण तिवाडे यांनी पाठपुरावा सुरू ठेवला त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी ब्रम्हपुरी पंचायत समितीला ग्रामसभा घेण्यात कळविले. त्यानुसार संवर्ग विकास अधिकारी सानप यांचे अध्यक्षतेखाली आज 17 मे 2014 ला ग्रामपंचायतीचे आवारात महीला ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत एकुण 145 महिला मतदारापैकी 104 महिलांनी ग्रामसभेत भाग घेतला व 145 महिलांनी दारूबंदीचे बाजुने हात बर केले तर मत दारू सुरूचें बाजुने एकही मत मिळाले नाही. यामुळे एकमताने दारूबंदीचा ठराव पारीत होऊन महिला शक्तीनी उभी बाटली आडवी केली.


या सभेत नायब तहसिलदार घोरपडे, सरपंच अरूण तिवाडे, दारूबंदी विभागाचे कुमरे, पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या दारूबंदी करीता संगिता चाफले, प्रतिभा शिवुरकार, भारती हटवार, कुदा भोयर आदी महिलांनी परीश्रम घेतले.








काव्यशिल्प









SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.