Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मे ०२, २०१४

जिवंतपणी मृत्यूचा अनुभव

जिवंतपणी मृत्यूचा अनुभव

तेरावी करणार तोच परतला 


कामाच्या शोधत गेलेला पती मरण पावल्याची खबर पत्नीला मिळाली आणि तिने कपाळाचे कुंकू पुसले.  ती शोकाकुल रडत होती. 
 ३ महिन्यापूर्वी पती काम करण्यासाठी परगावी आपल्या सहकार्यासोबत गेला होता. पण तो परत आला नाही.... दूरच्या नातेवाईकाने कोणीतरी केलेल्या मारहाणीत मरण पावल्याची बातमी कानी आली.आणी पतीच्या विरहात  पत्नीने मंगळसूत्र तोडले ... बांगड्या फोडल्या....
मृताच्या नावे दिवा पोहोचविला…

नव्हत कोणी रडायला माझ्याबरोबर,
तेव्हा, नव्हत कोणी हसायला,
आज जेव्हा शांतपणे झोपलोय मुक्त होऊन,
तर, आले सगळे टाहो फोडायला,

आज पहा माझा काय थाट!
लोक जमतील मला अंघोळ घालायला,
आयुष्यभर नाही पाहिल कधी कापड,
आज नवीन पांढरे-शुभ्र वस्त्र मला नेसायला,

(विनायक बेंद्रे यांची कविता)

दुस-या  दिवशी तेरवी करणार तोच तो त्या रात्री दत्त म्हणून प्रकटला ...
ज्याच्या सोबत तो कामाच्या शोधत गेला होता  तो सुद्धा आला। आणि त्याला  जिवंतपणी मृत्यूचा अनुभव आला. तर पत्नीला रडता रडता हसू आवरेना… हि घटना सावली तालुक्यातील हिरापूर येथे घडली। 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.