Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मे ०४, २०१४

एक लाख पाच हजार ८४४ पर्यटकांनी हजेरी




व्याघ्र दर्शनासाठी येणाऱ्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटकांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ नोंदविण्यात आली आहे. सुमारे एक लाख पाच हजार ८४४ पर्यटकांनी हजेरी लावल्याचे आकडेवारी सांगते.
पंकज मोहरीर, चंद्रपूर

भरपूर जैविक विविधता आणि नैसर्गिक वारसा लाभलेल्या तसेच घनदाट जंगलांनी व्याप्त असलेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. शक्ती व सौंदर्य याचे प्रतीक असलेल्या वाघाचा संचार असल्याने या प्रकल्पाला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीयस्तरावर महत्त्वाचे स्थान आहे. यामुळेच या व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ दिसून येत आहे. २०१०-११ मध्ये ७८ हजार ८८१, २०११-१२ मध्ये ४७ हजार ६३५, २०१२-१३ मध्ये ८६ हजार ५५७ तर २०१३-१४ मध्ये १ लाख ५ हजार ८४४ पर्यटकांनी हजेरी लावली. यात विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. एकूण १८ हजार ५१३ वाहनांद्वारे हे पर्यटक प्रकल्पात गेले.

२०१०-११ मध्ये ताडोबा-अंधारी टायगर कंझर्व्हेशन फाउंडेशनला ३५.३१ लाख, २०११-१२ मध्ये ४१-११ लाख, २०१२-१३ मध्ये १ कोटी ७५ लाख तर २०१३-१४ मध्ये २ कोटी ३३ लाख ४७ हजार ४४८ रुपयांचा महसूल मिळाला. हा आजवरचा सर्वात मोठा महसूल मानला जात आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने इको-टुर‌िझमला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यासोबतच ताडोबा व्यवस्थापनाचीही भूमिका महत्त्वपूर्ण राहिली, असे सुत्रांनी स्पष्ट केले. एरवी पर्यटकांची सर्वाधिक पसंती मध्य भारतातील कान्हा किसलीला दिली जाते. त्याखालोखाल ताडोबाचा क्रमांक लागत असे. मात्र मागील वर्षापासून पर्यटकांनी ताडोबालाच पसंती दिल्याचे समोर आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.