Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल १४, २०१४

काळापलीकडच्या वेदनेचा अनुभव देणारी ‘तुळसा!

काळापलीकडच्या वेदनेचा अनुभव देणारी ‘तुळसा!

टपाल सिनेमा आता येत्या आठवड्यात प्रदर्षीत होणार आहे. या निमीत्ताने विणा जामकरची ही मुलाखत 

दक्षिण आफ्रिकेतील ‘इफ्साङ्कमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावणारी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनातही मान्यवरांच्या कौतुकास पात्र ठरलेली तरुण अभिनेत्री वीणा जामकर सध्या चर्चेत आहे ते ‘टपाल या चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे. तिच्याचकडून अधिक जाणून घेऊया ‘टपाल आणि त्यातील ‘तुळसाविषयी.



‘मैत्रेय मास मिडियाचा पहिलाच चित्रपट ‘टपाल. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच तब्बल नऊ आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. थर्ड आय एशियन फिल्म फेस्टीव्हल तसेच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यामध्येही हा चित्रपट झळकला असून, गोव्यात झालेल्या ४४व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हलमधील इंडियन पॅनोरमा विभागात हजेरी लावून ‘टपालङ्कने रसिकांची उत्स्फूर्त दादही मिळवली आहे. या चित्रपटाच्या संदर्भात आणखी एक गोष्ट लक्षणीय ठरली आहे ती म्हणजे तरुण अभिनेत्री वीणा जामकर हिने वठवलेली तुळसाची भूमिका. या तुळसाच्या भूमिकेसाठी वीणाला नुकताच ‘इफ्सा‘ अर्थात ङ्कइंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ साऊथ आफ्रिकाङ्कमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तिने साता समुद्रापार मिळवलेल्या या यशाबद्दल ९४ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार qशदे यांच्या हस्ते तिचा सन्मानही करण्यात आला.

वयाच्या सहाव्या वर्षापासून रंगभूमीवर पाऊल ठेवून सुरू झालेला वीणाचा अभिनय क्षेत्रातला प्रवास लक्षणीय चित्रपटांचे टप्पे सर करत आज ङ्कटपालङ्कपर्यंत येऊन पोहोचला आहे. सुधा करमरकरांकडून नाट्यकलेचं
प्रशिक्षण, सत्यदेव दुबेंकडून अभिनयाचं प्रशिक्षण आणि बिरजू महाराजांकडून कथ्थकचं नृत्यांग प्राप्त केलेली ही अष्टपैलू अभिनेत्री आज मुख्यत: ओळखली जाते ती तिच्या ङ्कहटकेङ्क भूमिकांसाठी. त्यात आता ‘टपालच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा जगासमोर अधोरेखित होत आहे. या निमित्ताने तिच्याशी साधलेला हा मनमोकळा संवाद.

तुझ्या आजवरच्या भूमिका या नेहमीच वेगळ्या धाटणीच्या वाटत आल्या आहेत, काहीशा आर्ट
फिल्म्सच्या प्रकारात मोडणाèया. तुला व्यावसायिक सिनेमा करावासा नाही वाटला? की तू व्यावसायिक सिनेमांपासून स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवतेस?

नाही, असं अजिबात नाही. व्यावसायिक सिनेमांपासून दूर राहायचं असं मी कधी ठरवलं नव्हतं, आणि आताही तसा दृष्टीकोन नाही. मुळात कोणताच दिग्दर्शक वा निर्माता हा आर्ट qकवा व्यावसायिकतेच्या चौकटी पाहून स्वत:चा चित्रपट बनवत नसतो. काही चित्रपट हे थोडे वेगळ्या धाटणीचे असतात, ते प्रचलित व्यावसायिक चित्रपटांच्या चौकटीत बसत नाहीत म्हणून ते आपल्याला वेगळे वाटतात, इतकंच. खरं सांगायचं तर नेमका याच धर्तीवर ङ्कटपालङ्क इतर चित्रपटांपेक्षा वेगळा वाटतो. हल्ली आयटम साँग घातल्याने चित्रपट चालतो असं काही लोक मानतात. पण तसं न मानणारेही लोक आपल्याकडे आहेत जे असे निकष आपल्या चित्रपटांना लावत नाहीत. असे दिग्दर्शक आणि लेखक लोकप्रियतेसाठी चित्रपटाच्या दर्जाशी तडजोड करत नाहीत. ङ्कटपालङ्क हे याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. तसं पाहिलं तरटपाल कमर्शिअलच आहे, पण यात कथेशी प्रतारणा नाही. मला हे असे वेगळे चित्रपट करायला आवडतात.

वीणा, असं लक्षात येतं की बèयाचदा तुझ्या भूमिका या मध्यवर्ती भूमिकाच असतात असं नव्हे, पण तरी त्यात काहीतरी विशेष असतं, ज्यामुळे या छोट्या रोलनंतरही तू प्रेक्षकांच्या लक्षात राहतेस. नेमकं कायपाहून तू भूमिका स्वीकारतेस? भूमिकेतलं नक्की तुला काय भावतं?

आधी तर मी चित्रपटाची कथा ऐकते, एखाद्या निवेदनाप्रमाणे. प्रत्येक चित्रपटाची एक गोष्ट असते, ती आवडली तरच त्यातली भूमिका स्वीकारण्याचा प्रश्न येतो. मग त्या कथेत माझ्या भूमिकेचं स्थान काय आहे, तिचा कथेशी नेमका कसा संबंध आहे हे मी पडताळून पाहते. भूमिका मध्यवर्ती आहे की साईड रोल हा प्रश्नच मला निरर्थक वाटतो. भूमिका ही भूमिका असते, कथानकात तिचं स्वत:चं असं वेगळं स्थान असतं. ते स्थान नटाने पडताळून घ्यावं. त्यामुळे भूमिका निवडताना भूमिकेची लांबी, संवादांची लांबी हा निकष मी कधीच लावत नाही. ज्या भूमिकेमुळे माझ्यातल्या अभिनय कौशल्याचा कस लागणार असेल, काहीतरी आव्हानात्मक करण्याचा अनुभव मिळणार असेल अशा भूमिका मला स्वीकाराय ला आवडतात, कारण अशी आव्हानात्मक भूमिका वठवताना एक नट म्हणून आपला जो विकास होत जातो ती विकासाची प्रक्रिया मला अधिक महत्त्वपूर्ण वाटते.
टपालमध्ये तू ङ्कतुळसाङ्क नावाचं पात्र साकारलं आहेस. ही ङ्कतुळसाङ्क तुला का करावीशी वाटली? आज या ङ्कतुळसाङ्कने तुला दक्षिण आफ्रिकेतही मान मिळवून दिलाय. ङ्कतुळसाङ्क नावाच्या बाळाचे पाय तुला आधीच पाळण्यात दिसले होते?

अगदी असंच नाही, पण ङ्कतुळसाङ्कची ताकत मात्र तेव्हाच जाणवली होती हे नक्की. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर याने जेव्हा मला टपालची गोष्ट पहिल्यांदा ऐकवली तेव्हाच ही कथा मला मनोमन खूप आवडली होती. लक्ष्मण हा स्वत: एक चांगला निवेदक असल्याने त्याला दिग्दर्शक म्हणून जे सांगायचं होतं ते थेट माझ्यापर्यंत पोहोचलं. ७० च्या दशकातली, गावात राहणारी, मूलबाळ नसलेली आजवरच्या भूमिकांमध्ये वेगळ्याच ताकतीची वाटली. याचं एक कारण हेही होतं की, तिला फारसे संवाद नव्हते. त्यामुळे तिची व्यथा पडद्यावर केवळ अभिनयातून साकारण्याचं मोठं आव्हान मला स्पष्ट दिसत होतं त्यामुळे ही भूमिका मी स्वीकारली.
मग या आव्हानात्मक भूमिकेसाठी तू काय खास तयारी केलीस?
प्रांजळपणे सांगायचं तर काहीच नाही. कारण ‘टपालङ्कच्या आधीही मी अनेकदा ग्रामीण भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण पोशाख, वागणं-बोलणं पडद्यावर साकारणं हे काही माझ्यासाठी नवीन नव्हतं. पण मूल नसलेल्या स्त्रीचं दु:ख व्यक्त करणं हे एक मोठं आव्हान होतं. आणि गंमत म्हणजे ते शिकण्यासाठी खास अशा स्त्रियांचं निरिक्षण करण्याचीही काही सोय नव्हती. कारण मूल नसलेली बाई ही काही फार वेगळं वागत नसते. पण प्रत्येक क्षणी तिच्या मनात असलेली अपराधीपणाची भावना मात्र तिच्या वागण्या-बोलण्यातून व्यक्त होत राहते. ती इतरांसारखी हसेल, बोलेल पण त्यातही एक दु:खाची लकेर डोकावत असते. मला हे सगळं जाणवलं होतं, माझं तसं निरिक्षणही होतंच पण हे सर्व कोणत्याही प्रॅक्टिसशिवाय मला ‘ऑन द स्पॉट‘ अभिनयात आणावं लागलं. कारण भावना कशी व्यक्त करावी याचे ठोकताळे नसतात. त्यामुळे खरं तर मी भूमिकेसाठी कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करणं जाणीवपूर्वक टाळलं. प्रत्येक फ्रेम लावताना दिग्दर्शकाचा एक वेगळा दृष्टीकोन असतो तो ध्यानात घेऊन मी तुळसाच्या भावना व्यक्त करत गेले. पण हो, तुळसाला समजून घेण्यासाठी मला लक्ष्मणची खूप मदत झाली. प्रत्येक पात्राच्या बाबतीत दिग्दर्शकाच्या मनात काही ठराविक आडाखे असतात ते त्याने मला समजावून सांगितले. थोडक्यात, माझ्या आणि लक्ष्मणच्या मनातल्या तुळसाचा एक सुरेख मिलाप झालाय, जो सर्वांना लवकरच पडद्यावर पाहता येईल.

असं म्हणतात की, प्रत्येक चित्रपटाच्या टीममध्ये कॅमेèयामागे असलेली केमिस्ट्री ही कॅमेèयासमोरही
जाणवत असते. आजवर तू चित्रपटसृष्टीतल्या अनेक मातब्बर लोकांसोबत काम केले आहेस. त्या
पाश्र्वभूमीवर ‘टपाल‘च्या टीमसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता?खूप सुंदर! संपूर्ण टीमशी मस्त ट्युqनग झालं होतं. नंदू माधव हे खूप सिनियर नट असूनही त्यांच्यासोबत काम करताना

कधी दडपण आलं नाही, अर्थात याचं श्रेय त्यांच्या स्वभावाला जातं. असूया, स्पर्धा, दबाव अशा गोष्टींना आमच्या सेटवर थारा नव्हता. अगदी रंगाची भूमिका करणारा लहानगा रोहित उतेकरसुद्धा बिनधास्त वावरायचा सेटवर. लहान मुलांसोबत काम करताना, त्यांच्यातला अवखळपणा खरंच सुखावतो. लक्ष्मणमुळे आम्हा सर्वांच्या मनात कामाबद्दल नेमकेपणा असायचा. ‘टपाल‘ची संहिता तर मला आवडली होतीच, पण सोबतीला लक्ष्मणचे संवाद म्हणजे तर ‘सोने पे सुहागाङ्क असल्यासारखंच वाटलं मला. यातल्या प्रत्येक पात्राची स्वत:ची अशी वेगळी भाषा आहे. ही खरं तर लक्ष्मणच्या गावची भाषा आहे. त्यामुळे ती समजून घ्यायला त्याने खूप मदत केली. मला आठवतं, एका सीनमध्ये  तुळसा रंगाला म्हणजे त्या छोट्या मुलाला सांगते की ‘जा घरी निरोप देऊन ये, की आज घरी यायला उशीर होईल.‘ आधी हा डायलॉग म्हणताना मी साध्या टोनमध्ये बोलत होते. पण मग लक्ष्मणने मला समजावून सांगितलं, की हा एक

साधा डायलॉग असला तरी त्यात तुळसाच्या नजरेसमोर दिसणारा खूप मोठा आनंद लपला आहे. तो तुला तुझ्या आवाजाच्या टोनमधून व्यक्त करायचाय. मग हे लक्षात घेऊन मी त्याप्रमाणे माझा टोन बदलला आणि डायलॉगमध्ये जिवंतपणा आला. अतिशय सूक्ष्म पातळीवरचं हे निरीक्षण आणि काम मला खूप समृद्ध करुन गेलंय. असं म्हणतात, की चांगली पटकथा असेल तर तिथेच चित्रपट निम्म यश संपादन करतो, ते काम मंगेशने केलं तर सोबतीला लक्ष्मणचे संवाद, दिग्दर्शन आणि आमच्या संपूर्ण टीमच्या उत्तम परफॉर्मन्सने दुधात साखरच टाकली.  आतापर्यंत ‘टपाल‘ने एकूण नऊ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तर दोन राष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत आपला ठसा उमटवला आहे. यापैकी गोव्यातल्या ४४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झालेल्या  प्रदर्शनाच्या वेळी तू उपस्थित होतीस. प्रदर्शनाचा हा पहिलावहिला अनुभव कसा होता?
खूप स्पेशल अनुभव होता तो. वेगवेगळ्या देशांतले, वेगवेगळ्या भाषांचे प्रेक्षक तिथे चित्रपट पाहण्यासाठी आले होते. चित्रपट संपल्यावर काही मध्यम वयाच्या बायका हळूच माझ्याजवळ आल्या. त्यांचे डोळे पाणावलेले होते. त्यांनी काही क्षण फक्त माझा हात आपल्या हातात घेऊन माझ्याकडे डोळे भरुन पाहिलं. त्या काहीच बोलल्या नाहीत. खरं तर  काहीच बोलायची गरज उरली नव्हती. त्या नुसत्या स्मित करुन अव्यक्तपणे खूप काहीतरी सांगून निघून गेल्या. तेव्हा त्यांच्याशी शब्दांत संवाद साधणं निरर्थक ठरलं असतं, त्यांचा तो स्पर्शच मला सगळं काही सांगून गेला, खूप काही देऊन गेला. त्या क्षणी मला पटलं, की तुळसाच्या माध्यमातून, संवादाच्या पलीकडलं असं जे मला आणि ‘टपाल‘च्या टीमला सांगायचं होतं ते या बायकांपर्यंत थेट पोहोचलंय.
या पलीकडे एकूणच गोव्यातल्या रसिक प्रेक्षकांनी ‘टपाल‘ला अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. समीक्षक, पत्रकार यांनी तर प्रशंसा केलीच पण सर्वसामान्य प्रेक्षकांनी दिलेली दाद मला महत्त्वाची वाटली. ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू नेहमी सांगतात की प्रत्येक भूमिका ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे नटाला समृद्ध करत असते.

वीणाला तुळसाने काय दिलं?
अगदी खरं आहे हे. नट हा खूप भाग्यवान असतो कारण त्याला एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं जगण्याची संधी मिळते. मलाही तुळसामुळे ७० च्या काळातल्या खेड्यातल्या बाईची वेदना जगून पाहता आली. अन्यथा हे शक्य नव्हतं. कारण माझ्यासारख्या आजच्या पिढीतल्या, शहरात वाढलेल्या मुलीला मूल होणं qकवा न होणं या गोष्टीचं फारसं काही वाटतच नाही. त्यात आता तर मूल होऊ देणं qकवा न होऊ देणं हा सर्वस्वी दांपत्याचा निर्णय असतो हेही आपण मान्य करुनच चालतो. पण लग्नानंतर एखाद्या बाईला मूल न होण्याचं दु:ख, त्यात त्यासाठी तिलाच बोलणी खावी लागणं, तिनेही त्यासाठी स्वत:लाच दोष देणं, समाजाकडून ऐकावे लागणारे सततचे टोमणे हे साधारण ७० च्या काळातल्या स्त्रियांचं दु:ख मी तुळसामुळे समजू शकले, माझ्या मागच्या पिढ्यांशी समरस होऊ शकले. याचं श्रेयपूर्णपणे तुळसाला, पर्यायाने ‘टपाल‘ला जातं. स्त्रीचं अस्तित्व निव्वळ तिच्या प्रजनन क्षमतेशी जोडलं जाण्याचं दु:ख मी या निमित्ताने अनुभवू शकले. आपल्या आजच्या अनुभवांचा परिघ ओलांडून अधिक व्यापक अर्थाने मला स्त्रीचं दु:ख समजून घेता आलं. ही संधी मला तुळसाने दिली.

प्र: ‘टपाल‘मधला तुझा आवडता सीन कोणता?

तुळसा मंदिरात जाते तेव्हा आधी गावातल्या दोन बायका तिला टोचून बोलतात. मग मंदिरातून परतताना गावातल्या  पाटलाची बायको तिला खास अडवून काही सांगते. तेव्हा तुळसा कोणालाच काही प्रत्युत्तर देत नाही. ती फक्त आतल्या आत घुसमटत राहते. काहीच न बोलता तिची ही घुसमट पडद्यावर दाखवणं हे माझ्यापुढचं खरं आव्हान होतं. त्यामुळे हा सीन मला सर्वात जास्त आवडतो. त्या व्यतिरिक्त ‘दोन दिसांची सावलीङ्क हे गाणं मला फार आवडतं. या गाण्याचं चित्रीकरण खूपच सुरेख झालंय.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.