भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी दौ-यावर
नागपूर, दि. १८ - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी २० मार्च रोजी विदर्भात येणार असून या दौ-यात ते गारपीटग्रस्त शेतक-यांशी संवाद साधणार आहेत.
वर्धा येथील भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी मोदी २० मार्च रोजी विदर्भ दौ-यावर येणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. वर्धा येथील सभेनंतर मोदी गारपीटग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी या गावाला भेट देणार आहेत. याच गावात 'चाय पे चर्चा'देखील पार पडेल असे फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, मोदी यांच्या विदर्भ दौ-यासाठी गुजरात पोलिसांचे विशेष पथक यवतमाळमध्ये दाखल झाले आहे.