Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च १९, २०१४

निवडणूक खर्चावर बारकाईने लक्ष ठेवा - अतुलकुमार रस्तोगी

निवडणूक खर्चावर बारकाईने लक्ष ठेवा - अतुलकुमार रस्तोगी

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीदरम्यान पक्ष आणि उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चाचा तपशील बारकाईने नोंद करुन ठेवावा, अशा सूचना निवडणूक खर्च निरीक्षक अतुलकुमार रस्तोगी यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात व्हीडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे श्री. रस्तोगी यांनी सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत गडचिरोलीचे सहाय्यक निवडणूक अधिकारी पी. शिवशंकर, चामोर्शीचे सहाय्यक निवडणूक अधिकारी धर्मेंद्र सिंह, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, सर्व सहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक आदींची उपस्थिती होती.

श्री. रस्तोगी म्हणाले, जिल्हास्तरीय निवडणूक खर्च कक्षाशी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी सातत्याने समन्वय ठेवावा. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करतानाच निवडणुकीदरम्यान होणाऱ्या सभा, रॅली, बैठकांचे नियमित चित्रीकरण करुन त्याबाबतचा अहवाल दररोज जिल्हास्तरीय निवडणूक खर्च कक्षाला पाठवावा. प्रत्येक उमेदवाराचे शॅडो खर्चाचे रजिस्टर ठेवून खर्च स्त्रोतावर बारकाईने लक्ष ठेवावे.
----------------
टोल फ्री क्रमांक 07132-155212 कार्यान्वित

गडचिरोली : लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भातील आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास तसेच निवडणुकीसंदर्भातील इतर जनतेच्या     तक्रारी स्विकारण्यासाठी  जिल्हांधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. हा कक्ष चोवीस तास सुरु राहणार असल्यााची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हां निवडणूक अधिकारी रणजीत कुमार यांनी दिली. 

आचारसंहितेसंदर्भात तसेच निवडणुकीसंदर्भात नियंत्रण कक्षातील टोल फ्री क्रमांक 07132-155212 या दूरध्वनी क्रमांकावर आपली तक्रार नोंदविता येईल. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका शांततेत पार पाडण्यािसाठी सर्व मतदारांनी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हारधिकाऱ्यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.