Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च २०, २०१४

२१ मार्चला जागतिक वन दिन

‘वनांचे महत्त्व व त्यांचे संवर्धन’ याविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २१ मार्चला जागतिक वन दिन (जागतिक वनिकी दिन) साजरा केला जातो. १९७१ मध्ये युरोपिअन कॉनफिडरेशन ऑफ अ‍ॅग्रिकल्चर च्या २३ व्या बैठकीत हा दिन साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. या दिनानिमित्त वनिकी (Forestry) संदर्भातील उत्पादन, संरक्षण व रंजकता (recreation) या तीन महत्त्वाच्या घटकांबाबत जनजागृती करण्यात येते.

वनिकी (Forestry) हे वनव्यवस्थापन, वृक्षलागवड आणि संबंधित नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे. वनांद्वारे पुरविल्या जाणार्‍या नैसर्गिक सुविधांचा शाश्वत पुरवठा करण्याच्या दृष्टीने वनांचे व्यवस्थापन करणे हा वनिकीचा मुख्य उद्देश आहे.

जंगल / वन म्हणजे केवळ झाडे नाहीत तर ती अनेक सजीव-निर्जीव घटकांनी बनलेली गुतांगुतीची परिसंस्था आहे. जंगल निरनिराळ्या प्रकारचे पक्षी, सस्तन प्राणी, वनस्पती, कीटक, सरपटणारे प्राणी यांनी समृद्ध असून हे सर्व घटक एकमेकांशी जोडलेले असतात. त्याचबरोबर अन्नघटकांचे पुनर्चक्रीकरण करण्याचे मह्त्त्वाचे कार्य करणारे स्मूक्षजीव व बुरशीवर्गीय जीव देखील वन-परिसंस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.