Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी ०१, २०१४

लोकसभेच्या तिकीटाची माळ कुणाच्या गळ्यात

आम आदमी पार्टीने उमेदवारी घोषित करण्यापूर्वीच शेतकरी संघटनेने तिकीट मिळाल्यागत प्रचारच सुरू केला आहे. त्यामुळे आप च्या सामान्य कार्यकर्त्यात कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. नवरी एक, वर अनेक' अशी इचछुक  उमेदवार संख्या दिसून येत आहे. प्राप्त माहितीनुसार आप कडे ११-१३ जणांनी अर्ज केला आहे. याशिवाय प्रदेश कार्यकारणीच्या नेत्यांनी केलेली विनंती आणि मत परिवर्तन यामुळे उमेदवारीस तयार झालेले बंडू धोतरे आणि चटप यांच्या दावेदारीमुळे तूर्तास उमेदवारी संदर्भात संभ्रम  आहे. मात्र, येत्या काळात लोकसभेच्या तिकीटाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल, हे आताच सांगणे कठीण आहे। 


वामनराव चटप 
यांनी आपली राजकीय गाडी आता दिल्लीच्या वाटेने वळविली असून, येत्या लोकसभा निवडणुकीत ते दिल्लीचा किल्ला लढविणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. यातच त्यांनी आप सोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे मोठे चित्र बदलण्याची शक्यता आहे. जर चटप यांना आप ची तिकीट मिळाली नाही तर, ते कार्यकर्ता म्हणून आप च्या अन्य उमेदवाराचा  प्रचार करतील असे वाटत नाही. कारण त्यांनी केवळ लोकसभेच्या निवडणुकीसाठीच आजवर मोर्चे बांधणी केली आहे. त्यामुळे ती व्यर्थ जाईल. तिकीट  मिळाली नाही तर, ते शेतकरी संघटना किंवा अपक्ष उमेदवार म्हणून राहू शकतात. कारण ते मुळचे राजकारणी आहेत. राजकारणी हे खुर्ची आणि सत्तेशिवाय जगू शकत नाही.

‘शेतकऱ्यांना घामाचे दाम मिळावे’ पासून ‘त्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळावे’ यासाठी २५ वर्षापासून शेतकरी संघटनेचे काम करताना स्वतंत्र भारत पक्षाचे राज्याध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप हे खासदार शरद जोशी यांचे खंदे समर्थक आहेत. मात्र  संघटनेची ताकद केवळ राजुरा विधानसभा मतदारसंघापुरती मर्यादित आहे. याची जाणीव असल्याने चटप यांनी आता आप हीच संधी साधून उमेदवारीचा प्रचार सुरू केला आहे. काही वर्षापूर्वी शेतकरी संघटना युतीसोबत होती. तेव्हा संघटनेचे आमदार वामनराव चटप यांनी चंद्रपूर लोकसभेची जागा मागितली. ती न मिळाल्यानेगत निवडनुकीत  स्वतंत्र लोकसभा लढली. यावेळी आप ची तिकीट मिळाल्यागत प्रचारच सुरू केल्याने या नव्या समीकरणाचा फायदा नेमका कुणाला होतो याविषयी कमालीची उत्सुकता आहे. खरे तर शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेने २००४ साली भाजपाशी युती केली होती. त्याच भरोशावर खासदार झाले. आता आप ची टोपी घालून गेलेली पत पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे.
८ नोव्हें, २०१३  ला  चंद्रपूर येथे  झालेल्या शेतकरी संघटनेचे 12वे संयुक्त अधिवेशनात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. कट्टर विदर्भवादी चटप यांनी ६ डिसें, २०१३  रोजी प्रतिविधान सभेच्या  मुख्यमंत्रिपदावर बसविण्यात आले होते.
राजुरा विधानसभा मतदारसंघाचा संतुलित विकास करून एक प्रगतिशील मतदारसंघ म्हणून पुढे आणण्याचे बरेच श्रेय आमदार, शेतकरी संघटना समर्थित स्वतंत्र भारत पक्षाचे प्रश्नंताध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप यांना आहे. १५ वर्षे विधानसभा सदस्य असलेले अ‍ॅड. वामनराव चटप यांची कारकीर्द उल्लेखनीय आहे.
आंध्र सीमेवरील या मतदारसंघाची स्थिती पूर्वी अत्यंत दयनीय होती. रस्ते, पूल, विद्युतीकरण, शासकीय व शैक्षणिक कार्यासाठी इमारती, सिंचन, वैयक्तिक लाभाच्या योजना यांचा मोठा अनुशेष होता. अ‍ॅड. वामनराव चटप १९८९ मध्ये निवडून आले आणि मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून गेला.
जिवती तालुक्यातील १२ गावे राज्य शासनाने आंध्रप्रदेशला देण्याच्या निर्णयाविरोधात आमदार चटप यांनी विधानसभेत आवाज उठवला व लोकांची चळवळ उभारली.  राजुरा मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात औद्योगिकरण सुरू आहे. त्यामुळे वाढते प्रदूषण व कंत्राटी कामगारांच्या समस्या याबाबत चटप फारसे गंभीर राहिल्याचे दिसत नाही. राजुरा शहरात वनउद्यान वगळता सुशोभिकरणासाठी मोठा निधी दिला नाही. वर्धा नदीवरून सिंचनाचे छोटे प्रकल्प होण्याच्या शक्यतेबद्दल आमदार चटप यांच्याकडून फारसे प्रयत्न नाहीत. आरोग्याच्या सर्व सुविधा व निधी असतानाही माणिकगड पहाडावर कुपोषण सुरूच आहे.
-----------------------------
बंडू धोतरे 
हे कोणताही राजकीय गंघ नसलेला व्यक्ती आहे. त्यामुळे ते निवडनुकीत तग धरतील काय हा प्रश्नच आहे. पण, केजरीवाल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यास परिवर्तनासाठी सक्षम मन आणि ध्येयाची गरज आहे. समाज जागृतीत पुढे असलेले धोत्रे  परिवर्तनासाठी पुढे येत आहेत यात दुमत नाही मात्र त्यांना भाषण कौशल्य आणि राजकीय बांधणी करता येणे महत्वाचे आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून आप चा उमेदवार निवडण्यासाठी प्रदेश कार्यकारणीच्या नेत्यांनी चंद्रपुरातील काही समाज सेवि ची भेट घेतलि. त्यात बंडू धोतरे यांचे नाव होते. चंद्रपूरचे ख्यात  नाम व्यंग चित्रकार मनोहर सप्रे यांच्या मार्फतीने हि भेट झाली. प्रारंभी उमेदवारी ला नकार देणाऱ्या धोतरेनि परिवर्तनाची गरज बघून आप  कडे इचछुक  उमेदवार म्हणून अर्ज केला.
गेल्या १०-१२ वर्षात त्यांनी विविध उपक्रम राबविले. भविष्यात उद्भभवणाऱ्या समस्यांची जाणीव ठेवून वाघांच्या संरक्षणासाठी  उपोषण, जंगल वाचविण्यासाठी अदानी प्रकल्पाला विरोध केला. अदानी विरोधी आंदोलनामुळे ते देशपातळीवर पोहचले. त्याला शहरातील अन्य संघटना आणि नागरिकांनी दिलेली साथ महत्वाची होति. २५ जुलै, २००९ ला  बंडू धोतरे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले. तेव्हा मॅगसेसे पुरस्कार विजेते  राजेंद्रसिंग यांनी भेट दिली. गोंदियामधील १३२० मेगावॉट क्षमतेच्या तिरोडा औष्णिक वीज प्रकल्पासाठी अदानी पॉवरने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात दोन कोळसा खाणींचा प्रस्ताव पुढे आणला होता. प्रस्तावित खाणींतून दरवर्षी ४० लाख टन कोळशाचे उत्पादन केले जाणार होते, तर खाणींमुळे तब्बल १६०० हेक्टरमधील वनक्षेत्र नष्ट होणार होते. परंतु केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय मूल्यमापन समितीने २४ नोव्हेंबर रोजीच्या बैठकीत सदर कंपन्यांकडून पर्यावरण मंजूरीसाठी सादर झालेला प्रस्ताव खारीज करण्याचा निर्णय घेतला. पर्यावरणीय मंजुरीशिवाय कंपन्यांना या क्षेत्रात खाणकाम करता येणार नाही. खाणींचे हे दोन्ही प्रस्ताव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव क्षेत्रात मोडणारे होते. विदर्भातील पर्यावरणवादी संघटनांनी या प्रस्तावित खाणीच्या विरोधात आंदोलन सुरू केल्यानंतर राज्य व केंद्र शासनाला या विरोधाची दखल घेणे भाग पडले. येथील ‘इको-प्रो’ चे प्रमुख बंडू धोतरे यांनी वन्य जीवांच्या प्रश्नावर बेमुदत उपोषण केले होते. रेल्वे मालधक्का, धूळ प्रदूषण, बाबूपेठ उड्डाणपूल, यासारख्या प्रश्नांवर त्यांनी आंदोलन केले आहे. गेल्या वर्षी त्यांना 'संघर्ष सन्मान पुरस्कार' मिळाला. आप च्या विचारसरनीला पुढे नेइल, असा कार्यकर्ता आहे.  

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.