Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी २६, २०१४

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान

शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घ्या
- एकनाथराव खडसे

मुंबई, दि. 26:- खान्देश, विदर्भ व कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतदेण्यासंदर्भात आज संध्याकाळपर्यंत सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते एकनाथराव खडसे यांनी आज सकाळी केली. विधानसभेचे कामकाज सुरु होताच त्यांनी ही मागणीलावून धरली.

श्री.खडसे पुढे म्हणाले, इतक्या मोठया प्रमाणात शेतकऱ्यांची हानी झाली आहे की दिवसाकाठी 10-20 शेतकऱ्यांचे दूरध्वनी येत आहेत. नुकसान भरपाई मिळावी यासाठी सभागृहात काहीतरी मांडा अशी मागणी तेकरत आहेत. इतकी गंभीर परिस्थिती आहे. तेव्हा किमान अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेच्या उत्तरात यासंदर्भात सरकारने ठोस आश्वासन द्यावे, आपल्या कार्यपध्दतीनुसार नुकसानीचे पंचनामे होतच पण स्थायीआदेशाप्रमाणे राहतील, निकषात बसत नसतील त्यांना निकषात बसवून सरकारने आपदग्रस्तांना तातडीने मदत करण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी श्री.खडसे यांनी शेवटी केली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.