Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जानेवारी ०९, २०१४

महापौर चषक नागपूरने जिंकला

चंद्रपूर : चंद्रपूर पंचशताब्दी महोत्सव समिती, महानगरपालिका तथा चांदा जिल्हा फूटबॉल संघटनेच्या वतीने स्थानिक पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर विदर्भस्तरीय फुटबॉल सामने घेण्यात आले. यात १२ फूटबॉल संघांनी भाग घेतला. आज अंतिम सामना यंग अंसार क्लब नागपूर व सीडीएफए चंद्रपूर संघादरम्यान अत्यंत चुरशीचा झाला. ट्रायबेकरमध्ये चौथ्या प्रयत्नात यंग अंसार क्लब विजेता ठरुन महापौर चषकाचा धनी ठरला.
बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचशताब्दी महोत्सव समितीचे संयोजक माजी खासदार नरेश पुगलिया होते. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर संगीता अमृतकर, उपमहापौर संदीप आवारी, स्थायी समितीचे सभापती रामू तिवारी, आयुक्त प्रकाश बोखड, उपायुक्त राजेश मोहिते, रवींद्र देवतळे, विलास कंदेवार, अशोक नागापुरे, प्रविण पडवेकर, हिंदकेसरी अमोल लुथडे, फूटबॉल संघटनेचे अध्यक्ष के. के. सिंग, सचिव दीपक दीक्षित, सरवर खान यांची उपस्थिती होती.
विदर्भस्तरीय फूटबॉल सामन्यात अंतीम लढत होण्यापूर्वी ईगल क्लब नागपूर व बिग बेन क्लब नागपूर संघादरम्यान महिलांचा सामना झाला. यावेळी बीग बेन महिला संघाने ईगल क्लबवर २-0 अशी मात केली. फूटबॉलच्या अंतीम सामन्यात विजेता यंग अंसार क्लब नागपूरला महापौर चषक, रोख ३१ हजार रुपये प्रदान करुन सन्मानित करण्यात आले तर उपजिवेता सीडीएफए संघाला चषक व रोख २१ हजार रुपये बक्षिस देण्यात आले.
अंत्यत चुरशीच्या सामन्यात निर्धारीत वेळात १-१ अशी बरोबरी साधली. ट्रायबेकरच्या माध्यमातून उत्कंठावर्धक सामन्याचा निकाल जाहीर करण्यात आला. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.