बल्लारपूर : बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी जी.एन. वाहूरवाघ हे नेहमी गैरहजर राहतात. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित लोकांची कामे अडून पडतात. या कारणाने संतापून बसपाच्या नगरसेवकांनी आज गुरुवारी दुपारी मुख्याधिकारी यांच्या कक्षाला कुलूप ठोकले. मुख्याधिकारी वाहूरवाघ हे शनिवारपासून बाहेरगावी आहेत. आजही ते कार्यालयात गैरहजर होते. बसपाचे नगरसेवक राजू झोडे, विकी दुपारे आणि गटनेते संपत कोरडे आणि इतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या कक्षाला कुलूप लावले. तसेच 'बसपा नगर सेवकांनी मुख्याधिकार्यांच्या कार्यालयाला ताला लावला' अशा शब्दात लिहिलेली सूचना दारावर चिपकवली. या संदर्भात गटनेते संपत कोरडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मुख्याधिकारी वारंवार गैरहजर राहत असल्यामुळे लोकांची अनेक कामे प्रलंबित राहत आहेत. शहराच्या विकासावर त्याचा परिणाम पडत आहे. मुख्याधिकार्यांचे विकासात्मक कामांकडे दुर्लक्ष आहे. तसेच कर्मचार्यांवर त्यांचा वचक नसल्याने व्यवस्थापन बिघडत चालले आहे. या सर्व बाबी विकास कार्याच्या आड येत आहेत. वाहूरवाघ यांची बदली करा अन्यथा आम्ही मुख्याधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकू, असा इशारा जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे. वाहूरवाघ यांना दूरध्वनीवरुन संपर्क केला असता ते म्हणाले, लोकांचे वा नगरपरिषदेचे कोणतेही काम मी अडवून ठेवले नाही. |
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
गुरुवार, जानेवारी ०२, २०१४
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments