Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, डिसेंबर २३, २०१३

विमा योजनेच्या निधीत वाढ करण्याची मागणी

छात्रभारती चे राज्यपालांना पत्र; विद्यार्थी सुरक्षा

नगर :- पुणे विद्यापीठाअंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळामार्फत जी विमा योजना राबवली जाते त्या योजनेची अपघात ग्रस्त विद्यार्थ्यांना मिळणारी विमा रक्कम हि अत्यंत तटपुंज्या स्वरुपाची असून या योजनेच्या विमा निधी मध्ये वाढ करण्यात यावी अशा मागणीचे पत्र छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे महाराष्ट्राचे राज्यपाल के शंकरनारायण आणि पुणे विद्यापीठाचे उप कुलगुरू वासुदेव गाडे यांना पाठविण्यात आले. या योजनेचा पुणे विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या ६१२ महाविद्यालयांमधील जवळपास साडे पाच लाख विद्यार्थ्यांना फायदा होतो.यावेळी छात्रभारती चे शहर जिल्हाध्यक्ष केदार भोपे, उप शहराध्यक्ष गजानन भांडवलकर, संघटक भरत वाकळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते

या विमा योजनेंतर्गत जर विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झालाच तर त्याच्या पालकांना पन्नास हजार रुपये पर्यंत दावा रक्कम म्हणून मिळतात. तसेच जर त्या विद्यार्थ्याला अपघातात अपंगत्व आले असेल तर त्याला त्याच्या अपंगत्वाच्या प्रमाणानुसार ठराविक रक्कम दिली जाते. परंतु विद्यार्थ्याला अथवा त्याच्या पालकांना मिळणारी ही रक्कम अत्यंत तटपुंज्या स्वरुपाची आहे. वास्तविक पाहता अपघाताचे स्वरूप जास्त असताना सुद्धा विद्यार्थ्याला कमी रक्कम मिळते. यामध्ये फक्त अपघातानंतर झालेल्या दवाखान्यातील खर्चाची रक्कम मिळते. परंतु अपघातानंतर त्या विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणावर शारीरिक नुकसान झाल्याने / अपंगत्व आल्याने त्याला पुढील कित्येक महिने घरीच बसून राहावे लागते त्यामुळे त्याला मिळणाऱ्या विमा रकमेत वाढ होणे गरजेचे आहे. विमा रकमेचा लाभ मिळविण्यासाठी विद्यार्थ्याला दरवर्षी १० रु शुल्क भरावे लागते. परंतु जर याच शुल्कामध्ये अजून २० ते ३० रु ची वाढ केल्यास विद्यार्थ्याला मिळणाऱ्या विमा रकमेत कमीत कमी पन्नास हजार ते एक लाख रु पर्यंत वाढ होईल. आणि याचा गरीब आणि सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेऊन विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या गरीब आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.