Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर ०७, २०१३

माजी प्रदेशअध्यक्ष मुनगंटीवार नवे विरोधी पक्षनेते होणार

विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना प्रकृतीच्या कारणामुळे विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी सुधीर मुनगंटीवार यांची वर्णी लागणार असल्याची माहिती आहे.


भारतीय जनता पक्षाच्या देशव्यापी गडाची बांधबंदिस्ती करण्याची जबाबदारी नितीन गडकरी यांच्याकडे सोपवण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातील गड राखण्याची जबाबदारी पक्षाने विदर्भातील नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सोपवली होती. फेब्रुवारी 2010रोजी जळगाव येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद बल्लारशाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दोन वर्षे जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांच्या जागी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली.
विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे मुलाच्या मृत्यूनंतर खडसे पूर्वी सारखे राजकारणात सक्रिय नाहीत. येत्या हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची भाजपची तयारी आहे. यामुळेच भाजपने विरोधी पक्ष नेतेपदी सुधीर मुनगंटीवार यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. सुधीर मुनगंटीवार हे नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय असून त्यांचा नावाला दिल्लीतूनही हिरवा कंदील मिळाला आहे. विरोधी पक्ष नेते म्हणून सुधीर मुनगंटीवर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले असून, आठवड्याभरात भाजपकडून याची अधिकृत घोषणा होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.