Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर ०७, २०१३

चंद्रपूरची मानसी मोघे 'मिस युनिवर्स' स्पर्धेत

Manasi Moghe Miss India Universe 2013. Picture Gallery


चंद्रपूर : राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत मागास समजल्या जाणार्‍या चंद्रपूर जिल्ह्याने विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. आता याच चंद्रपुरातील मानसी मोघे ही तरुणी फॅशन क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या प्रथम फेरीसाठी पात्र ठरली आहे. ती सध्या रशियामध्ये असून ९ नोव्हेंबर रोजी ही स्पर्धा पार पडणार आहे. मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या मिस दिवा स्पर्धेत संपूर्ण भारतातून तिने प्रथम क्रमांक पटकाविला. यानंतर तिची मिस युनिव्हर्सच्या प्रथम फेरीत निवड करण्यात आली आहे. यापूर्वी तिने फेमिना मिस इंडिया स्पर्धेत स्थान पटकाविले होते. तब्बल सात हजार स्पर्धकांमधून अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या २३ स्पर्धकांमध्ये तिचा समावेश झाला होता.
फॅशन क्षेत्रात आपली नाममुद्रा उमटविणारी मानसी येथील वेकोलिच्या क्षेत्रीय रूग्णालयात मुख्य चिकित्सा अधिकारी पदावर कार्यरत डॉ. मिलिंद मोघे यांची कन्या आहे. तिची आई डॉ. जयश्री मिलिंद मोघेसुद्धा याच रूग्णालयात उप मुख्य चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत.
■ यापूर्वी झालेल्या मिस इंडिया स्पर्धेसाठी देशभरांतून विविध झोनल स्पर्धाघेण्यात आल्या. मानसीने नागपूरच्या स्पर्धेत सहभाग घेतला. येथे तिची निवडझाली नाही. मात्र या अपयशाने खचून न जाता ती पुणे येथील मिस आयकॉन आय या स्पर्धेत सहभागी झाली. येथे तिने आपल्या प्रतिभेची चुणूक दाखविल्यामुळे तिला मिस इंडिया स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला. या स्पर्धेची अंतिम फेरी २४ मार्च रोजी मुंबईत झाली. या स्पर्धेनंतर तिने दिवा स्पर्धेत सहभाग घेतला. यात तिची निवड करण्यात आली आहे. मानसी नागपुरातील सेंट पलोटी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे.
Manasi Moghe is an Indian beauty queen and the winner of Miss Indian Diva 2013. She will be representing India at Miss Universe 2013 in Moscow, Russia on November 9, 2013
Manasi Moghe was born in Indore, Madhya Pradesh, India. She completed her schooling from Indore. She had done graduation B.E.in Electronics & Telecommunication from Nagpur University. Her parents are doctors working with Coal India Limited at chandrapur (MS)

Miss India Universe 2013 

The Miss Diva 2013 finale, held on 5th September 2013 Thursday night at Hotel Westin Mumbai Garden City, saw 14 finalists, including Manasi Moghe, competing against each other to win the title.
Manasi Moghe was crowned Miss Diva 2013, while Gurleen Grewal and Srishti Rana were declared runner-up and second runner-up, respectively. 

Femina Miss India 2013

Manasi was one of the 21 finalists of Femina Miss India 2013. She got Wild Card Entry to the Pageant where she won Miss Active sub-title.
BornManasi Moghe
August 29, 1991 (age 22)
IndoreMadhya PradeshIndia
Height1.73 m (5 ft 8 in)
Hair colorBrown
Eye colorHazel
Title(s)Miss Active in Pond's Femina Miss India Mumbai 2013
Miss Eyeconic EyeFemina Miss IndiaPune 2013
Indian Diva 2013
Major
competition(s)
Indian Diva 2013
(Winner)
Miss Universe 2013
Manasi Moghe Miss India Universe 2013. Photo Gallery Manasi Moghe Miss Indian Diva 2013 winner photoManasi Moghe Miss Indian Diva 2013 winner photoManasi Moghe Miss India Universe 2013. Picture Gallery Manasi Moghe Miss Indian Diva 2013 in sari photo

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.