Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, नोव्हेंबर ०८, २०१३

खडसेच राहणार विरोधी पक्षनेतेपदी


'विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना प्रकृतीच्या कारणामुळे विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी सुधीर मुनगंटीवार यांची वर्णी लागणार असल्याची माहिती प्रकाशित झाल्यानंतर
राजीनाम्याचे वृत्त चुकीचे व निराधार असल्याची प्रतिक्रिया ना. एकनाथराव खडसे यांनी दिली. गुरुवारी रात्री फेसबुकवर दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले, विधानसभेतील विरोधीपक्षनेते पदाचा आपण राजीनामा दिलेला नसून काही वृत्तपत्र व वृत्तवाहिनींवरून राजीनाम्यासंदर्भात दिले जाणारे वृत्त चुकीचे व निराधार आहे. माझी प्रकृती ठणठणीत असून येत्या 4 ते 5 दिवसात मी जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असेन.

------------------------------------------------
'विरोधी पक्ष नेतेपदी सुधीर मुनगंटीवार यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे का, अशी माहिती खुद्द काही पत्रकारांनी मुनगंटीवार यांना विचारली असता , त्यांनीही वृत्त चुकीचे असल्याचे म्हणाले. दरम्यान चंद्रपूर येथील स्थानिक दैनिक महाविदर्भने या संदर्भात वृत्त प्रकाशित केले. त्यात प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार म्हणाले, विरोधी पक्ष नेतेपद घेण्याची माझी इच्छा नाही. मी माझ्या मतदार संघात सुखी आहे. माझ्या पक्षातील काही पुढारी व कार्यकर्ते अशा बातम्या देतात आणि राजकीय वातावरण दुषित करतात, परंतु जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू असे सांगितले.



फेसबुक आलेल्या प्रतिक्रिया-

Baban Harne Bare zale natha bhau cha bhar halaka hoil ani khup ulatsulat charcha rangayachya vidhimandal parisarat !

Wiklangsewasanstha Centerforhandicappedsudhirbhau virodhi paxneta pad changlya prakare sambhalu shaktat...karan changla vakta,samaysuchkta shabdhasangrah aani body laungvage sarv tyanche kade uplabdh aahe...shivay tyanche charitryavar va karykartutvavar kunalahi vavage nahi...bjp ni chuk sudharun sudhirbhaula pudhil nivadnukikarita virodhi pax nete pad dhyave....

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.