ब्लॅक गोल्ड सिटी
चौकातील दिवस
देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर, ता. १७ : शहरात आगमन आणि अवागमन करताना जटपुरा प्रवेशदारातून जावे लागते. त्यामुळे जटपुरा कुणी बघितला नाही, कुणी ऐकला नाही, असा व्यक्ती शहरात शोधूनही सापडणार नाही. या जटपुरा गेट चौकाची दिवसभरातील खासियत निरनिराळी असलीतरी येथील मोगरा फुलांचा सुगंध मनाला भुरळ घालणारा आहे.
राज्याच्या एका टोकावर वसलेले चंद्रपूर शहर. या शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. आता विविध उद्योगांनी गजबजलेले हे शहर पूर्वी गोंड राज्यांच्या आधिपत्याखाली होते. त्यांनी बांधलेल्या परकोटाची qभत आणि त्यातीलच एक द्वार म्हणजे जटपुरा. जाट नावाचा सैनिक शहीद झाल्यानंतर या द्वाराला हे नाव पडले.
पूर्वी जटपुरा गेटच्या बाहेर ब्रिटिशांनी कचेरी उभारली होती. तिथे डिस्ट्रिक्ट कौन्सिल होते. आता येथे जिल्हा परिषदेची इमारत आहे. सराई मार्केटसुद्धा इंग्रजकाळापासून आहे. मात्र, ही इमारत आता जीर्ण झाली आहे. काळानुरूप बदलानुसार जटपुरा गेट परिसराचे चित्र बदलले आहे. जिथे पूर्वी कैलारू आणि साधारण सिमेंटच्या इमारती होत्या, तिथे आज मोठ्या आणि सौंदर्यीकरण झालेल्या इमारती उभ्या झाल्या आहेत. या गेटच्या दोन्ही कडेला सुपर बाजार, किराणा व हार्डवेअर दुकाने, मद्यालये आहेत. खासगी रुग्णालयांमुळेही गेट परिसरात नेहमीच वर्दळ असते. बालरोग, स्त्री प्रसूती, सिटी स्कॅन, कान, नाक, घसा आदी रोगांवर येथे उपचार होतो. या परिसरातील वसंत भवन अणि जिल्हा परिषदेची शाळा आहे. ऐतिहासिक वारशामुळे जटपुरा गेट शहराची शान म्हणूनच उभा आहे.
या चौकात पहाटे चार वाजेपासूनच वर्दळीला प्रारंभ होतो. पहाटेच्या वेळी मोगèयापासून बनविलेले गजरे विक्रीसाठी येतात. मोगरा कितीही दूर असला तरी सुगंध आल्याशिवाय राहात नाही, त्यामुळे ग्राहकही आकर्षित होतात. गेटसमोरील वडाच्या झाडाखाली चार-पाच विक्रेते सकाळी-सकाळी कामानिमित्त बाहेर निघणाèयांना गजरा खरेदी करण्याची विनंती करतात. याचवेळी चौकात येतात ते आलूपोहावाले. आलूपोह्यावर तर्री मारून qलब पिळून सकाळचा नास्ता करण्यासाठी गर्दी होते. सोबतच चहा, ब्रेड आणि दुधाच्या पॅकेटची येथे विक्री होते. सात-आठ वाजल्यापासून वस्तरा, कैची आणि ङ्केस काढणारी साबण घेऊन आठ-दहा नाव्ही येतात. महानगरपालिकेच्या व्यापार संकूलासमोर एका रांगेत हे नाव्ही कचकच केस कापायला सुरवात करतात. त्यानंतर पानटपरी, कळविक्रेते, ऊस रसवंतीची दुकाने लागतात. हा व्यवसाय दिवसभर सुरू असतो. सायंकाळ आणि रात्री बारापर्यंत येथील गर्दी कायम असते.