चंद्रपूर - कारागृहातून फरार झालेल्या बंदिवानाला नागपुरात तहसील पोलिसांनी वाहनचोरी प्रकरणात साथीदारासह अटक केली. नरेश कुमरे (२५ , रा. आलापल्ली , जि. गडचिरोली) व प्रमोद अरुण गेडाम (२५ रा. वणी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पाच महिन्यांपूर्वी नरेश व अन्य दोन बंदीवान कारागृहातील भिंतीवरून उडी मारून फरार झाले होते. दोघांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र , नरेश फरार होता. या प्रकरणात चार कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आले होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर , गौतम इंगळे, संजय आठवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन वाहने जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान नरेश फरार कैदी असल्याचे समोर आले. याबाबत चंद्रपूर कारागृह प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
रविवार, ऑक्टोबर ०६, २०१३
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments