Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑक्टोबर १४, २०१३

माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांचे निधन

पुणे- ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, ‘वनराई’चे संस्थापक आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मविभूषण मोहन धारिया यांचे सोमवारी सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षाचे होते.
गेल्या काही दिवसांपासून धारिया यांना मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रासले होते. धारिया यांना थकव्यासोबत श्‍वसनाचाही त्रास होत होता. मागील दोन-तीन दिवसापासून त्रास वाढल्याने आणि रक्तदाब अचानक कमी झाल्याने शनिवारी त्यांना पूना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास धारिया यांची प्राणज्योत मालवली.
महाड तालुक्यातील नाते हे त्यांचे मूळ गाव. मोहन धारिया हे उच्चशिक्षणासाठी पुण्यात आले. तेथे त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय सहभाग घेतला. कायद्याची पदवी मिळवल्यावर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. समाजवादी विचारसरणीचे असलेले धारिया हे सुरुवातीला प्रजा समाजवादी व नंतर काँग्रेस पक्षात दाखल झाले.
धारिया १९५७ ते १९६० या कालावधीत पुणे महापालिकेचे सदस्य होते. यानंतर ते लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. केंद्रात विविध महत्त्वाच्या खात्यांमध्ये राज्यमंत्री म्हणून काम केले.  त्यांना नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपदही देण्यात आले होते.
१९८० साली निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर धारिया राजकारणातून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर धारिया यांनी ‘वनराई’ या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे गावागावांमध्ये वृक्षारोपण आणि बंधारा बांधून पर्यावरण रक्षणाचे कार्य केले. स्वातंत्र्यसैनिक धारिया यांना पद्मविभूषण देऊन गौरव करण्यात आला होता.

मोहन धारीया

विद्यमान
पदग्रहण
इ.स. १९७१
मागीलएस.एम. जोशी
पुढीलविठ्ठल नरहर गाडगीळ
मतदारसंघपुणे
कार्यकाळ
इ.स. १९७१ – इ.स. १९७७
मागीलएस.एम. जोशी
पुढीलमोहन एम. धारीया
मतदारसंघपुणे
कार्यकाळ
इ.स. १९७७ – इ.स. १९८०
मागीलमोहन एम. धारीया
पुढीलविठ्ठल नरहर गाडगीळ
मतदारसंघपुणे

राजकीय पक्षभारतीय राष्ट्रीय काँग्रेसजनता पक्ष
निवासपुणे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.