दिनांकः 27 सप्टे 2013
चंद्रपूर शहरालगत असलेल्या महाऔष्णीक वीज केंद्रातील जुने संच क्रं 1 व 2 शहरातील वाढत्या प्रदुषणास कारणीभुत ठरत असुन, सुमारे सात ते आठ किलोमीटरच्या परिघातील जनता आजारी होत आहे. यासंदर्भात पर्यावरणमंत्री संजय देवतळे यांना एप्रील 2013 मध्ये पत्र देऊन दोन्ही संच बंद करण्याची मागणी केली होती. त्यांनी उर्जामंत्री, पर्यावरण विभाग, प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे उचित कारवाईसाठी पाठपुरावा केला. त्यांनतर येथील प्रदुषण नियंत्रण मंडळाने वरीष्ठ कार्यालयास दिलेल्या अहवालातील माहिती धक्कादायक आहे. त्यानुसार हे दोन्ही संच बंद करण्याच्या मागणीकरीता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी दिला आहे.
कोळशावर आधारीत विजनिर्मीती करण्यासाठी चंद्रपूर शहरालगत 1983 मध्ये महाऔष्णीक वीज केंद्राची स्थापला झाली. 15 आॅगष्ट 1983 मध्ये पायाभरणी झाल्यानंतर संच क्रमांक 1 मधुन1 नोव्हे 1984 पासुन 210 मेगावॅटची वीज उत्पादन सुरू करण्यात आले. त्यानंतर 16 सप्टेबर 1985 मध्ये युनीट क्रमांक दोन मधुन 210 मेगावॅट क्षमतेची वीज निर्मीती सुरू झाली. या दोन्ही संचाच्या चिमणीची उंची केवळ 90 मीटर आहे. या संचाचे डिझाईन जुन्या तंत्रज्ञाानानुसार करण्यात आले असुन या संचाचे डिझाईन 757.5 मायक्रो गॅ्रम/प्रती घनमीटर इतके आहेे. मात्र, हे दोन्ही संच आता 30 वर्षे जूने असल्याने प्रदुषणाची पातळी वाढलेली आहे. नवीन नियमानुार नव्याने उभारण्यात येणारे प्र्रकल्पांना प्रदुषणाचे मानक हे 50 मायक्रो ग्रॅम/प्रती घनमीटर असे आहेत. मात्र या दोन संचाकरिता 150 मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर चे मानक निश्चीत केलेले आहेत, म्हणजेच या संचाना एकप्रकारे सुट देण्यात आलेली आहे असे असतांना सुध्दा या दोन्ही संचातुन सुमारे 500 मायक्रोग्रॅम/घनमीटर पेक्षा अधीक प्रदुषण होत आहे.
पर्यावरण मंत्री संजय देवतळे यांनी इको-प्रोच्या तक्रारीची दखल घेतल्यानंतर संबधित विभागाने येथील प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयास विचारणा केली असता वरीष्ठ कार्यालयास देण्यात आलेला लेखी स्वरूपात देण्यात आलेला अहवाल धक्कादायक आहे. या अहवालात प्रादेशीक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुंषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर यांनी संच क्रमांक 1 व 2 मधून होणारे प्रदुषण निर्धारीत मानकापेक्षा (100 मायक्रो गॅ्रम/प्रती घनमीटर) पेक्षा जास्त आहे. जाने 2012 ते एप्रील 2013 पर्यत संच क्रमांक 1 व 2 मधुन सरासरी अनुक्रमे 383.91 व 642.92 इतके धोकाच्या पातळीबाहेर आहे. या अहवालात नमुद केल्याप्रमाणे वीज प्रकल्पाच्या सभोवताल 7 ते 8 कीमी पर्यत वायुप्रदुषणास कारणीभुत ठरत असल्याचे नाकारता येत नाही असे प्रदुषण नियत्रंण मंडळाने संच 1 व 2 बाबत स्पष्ट केले आहे. यावरून शासन मंुबई-पुणे सारख्या पच्छिम महाराष्ट्रात विजेच्या गरजेसाठी संच 1 व 2 सारख्या प्रदुषीत संचाना विज निर्मीती करीता सुरू ठेवून सर्वसामान्याचे आरोग्य बेजार करीत आहे.
प्रदुषणाचे परिणामः
या संचामधुन होणारे प्रदुषणामुळे शहरातील जनजीवनावर मोठया प्रमाणात होण्यामागे हे संच खुप जुने असणे, जुन्या तंत्रज्ञानुसार बनल्याने तसेच या संचाच्या चिमणीची उंची कमी असणे हे मुख्य कारण आहे. या राखेच्या प्रदुषणाचा परिणाम नागरीकांसोबत, वृक्ष, लोकवस्ती, पक्षी, जनावरे यांच्यावर होतो. श्वसननलिका खराब होऊन दमा, अस्थमा तसेच स्किनचे आजार, डोळयाचे आजार होत आहेत. नवीन जन्माला येणारे बाळ आजार घेऊन जन्मास येत आहे. त्यामुळे वृक्षांमध्ये कार्बोहायडेªड तयार होत नाही. झाडाची पुर्ण वाढ न होता निष्पर्ण होतात. मानव, प्राणी, वृक्ष या तिन्ही घटकांवर परिणाम होतो. घरात, गाडीवर धूळ साचलेली दिसते त्याची बाधा पोहचुन मानवी आरोग्य धोक्यात आले आहे.
इको-प्रो चा पाठपुरावाः
1. 4 एप्रील 2013 पर्यावरण मंत्री संजय देवतळे यांना निवेदन
2. 16 एप्रील 2013 इको-प्रोच्या पत्राची दखल घेत मा. संजय देवतळे यांचे मा. उर्जा मंत्री, प्रधान सचिव, उर्जा, सचिव, पर्यावरण विभाग, सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांना पत्र
3. 2 मे 2013 महाराष्ट्र प्रदुषण मंडळ, मंुबई यांचे प्रादेशीक अधिकारी, मं.प्र.नि. मंडळ, चंद्रपूर यांना पत्र
4. 7 मे 2013 प्रादेशीक अधिकारी, मं.प्र.नि.मंडळ, चंद्रपूर यांचा अहवाल महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांना सादर
5. 23 मे 2013 इको-प्रो ने मं.प्र.नि. मंडळ चंदपूर कडुन माहीती अधिकारात माहीती मिळविली.
6. 26 जुलै 2013 इको-प्रो ने सिटीपीएस कडुन माहीती अधिकार माहीती मिळवीली.
पत्रकार परिषदेस सहभागी पदाधिकारी/कार्यकर्तेः
बंडु धोतरे, अध्यक्ष इको-प्रो संस्था, चंद्रपूर
नितीन रामटेके, इको-प्रो, पर्यावरण विभाग प्रमुख
प्रा. डाॅ. नरेद्र दहेगांवकर, नितीन बुरडकर, संदीप इंगोले