चंद्रपूर - अन्नधान्य वितरणाची माहिती संबंधितांना होण्याकरिता पुरवठा विभागाने "ग्रुप एसएमएस प्रणाली' कार्यान्वित केली आहे. जुलै महिन्यात एकूण 33 हजार 442 लाभार्थ्यांना "एसएमएस' करण्यात आला आहे.
जिल्हा दक्षता समितीची बैठक सोमवारी (ता. पाच) घेण्यात आली. या बैठकीत पुरवठा विभागाने याची माहिती दिली. अध्यक्षस्थानी पालकमंत्री संजय देवतळे होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुंभरे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सी. एस. डहाळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी आडे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, सुभाष रघाताटे आणि मध्यवर्ती बॅंकेचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पुरेशा नियतनाची (धान्य) मागणी करून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल, याची खबरदारी घ्या, अशा सूचना पालकमंत्री संजय देवतळे यांनी जिल्हा पुरवठा विभागाला दिल्या.
जिल्ह्यात शिधापत्रिकाधारकांना 5 किलो गहू व 30 किलो तांदूळ वाटप केले जाते. परंतु, जिल्ह्याच्या काही भागातील नागरिकांची गहू वाढवून देण्याची मागणी पाहता तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांच्या शिधापत्रिका पावसाचे पाणी घरात घुसल्यामुळे खराब झाल्या अथवा नष्ट झाल्या. अशा नागरिकांना नव्याने शिधापत्रिका देण्यात याव्यात, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. अंत्योदय योजनेअंतर्गत जिल्ह्यात 16 हजार लाभार्थ्यांची शासनाच्या सूचनेनुसार नव्याने निवड करण्यात आली. मात्र, नियतन जुन्या पद्धतीनेच मिळत असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी समितीच्या निदर्शनास आणून दिले. यावर शासनाला पत्र लिहिण्याचे पालकमंत्री यांनी सुचविले.